भीतीदायक! पुणे स्टेशनवर तरुणीला रिक्षा चालकाची अरेरावी
तरूणीकडून घडलेली आपबीती सोशल मिडीयावर शेअर, अॅपवरुन बुकिंग केल्यामुळे बघून घेण्याची धमकी
पुणे – कोणत्याही शहरात रिक्षा किंवा टॅक्सी चालकांची अरेरावी नेहमीच चर्चेचा विषय असते. कधीतरी अडवणूक किंवा जास्त पैशांची मागणी केल्यामुळे वादाचे प्रसंग घडत असतात. आता पुण्यातही एका महिलेला रेल्वे स्टेशन परिसरात अशा प्रसंगला समोरे जावे लागले. त्यामुळे तिने सोशल मिडीयावर याविरोधात आवाज उठवला आहे.
पुणे रेल्वे स्थानक परिसरात आलेला अनुभव एका तरुणीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ती तरूण रेल्वे स्टेशन परिसरात आल्यानंतर तिने काही रिक्षा चालकांना तिला जायच्या ठिकाणाविषयी संगितल्यानंतर जास्त पैशाची मागणी केली. त्यानंतर तिने मोबाईल अॅपमधून रिक्षा बुक केली. यानंतर एका ऑटोचालकाने उबरवरील भाडे किती आहे, हे विचारले. तरुणीने उत्तर दिले की, १६० रुपये आहे. यावर तो ऑटोचालक चिडला आणि म्हणाला, “हे खूप कमी आहे, २०० रुपयांत चला माझ्यासोबत.” पण तिने स्पष्टपणे सांगितले की, तिची कॅब आधीच बुक आहे. यानंतर त्या रिक्षा चालकांने तरुणीसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. एवढेच नाहीतर उबरवरून भाडे स्वीकारणाऱ्या रिक्षावाल्यासोबतही त्याने वाद घातला. उबर ड्रायव्हरनेही “हे अॅपचे रेट आहेत, यात तुम्ही हस्तक्षेप करू नका.” असे उत्तर दिले. तरीही तो तरुणीसोबत वाद घालत होता, त्यामुळे तरूणीने मोबाईलवर शूटिंग काढायला सुरूवात केली. दरम्यान तरुणीने सांगितले की, हा अनुभव तिच्यासाठी नवीन नाही. ती प्रवास करणारी महिला असून, पुणे स्टेशनवर तिला अनेकदा अशा समस्यांना सामोरे जावे लागले आहे. परंतु यावेळी तिने हा विषय उचलून धरण्याचा निर्णय घेत ही घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे.
पुणे स्टेशनवर स्थानिक ऑटोचालकांचा मनमानी कारभार आणि प्रवाशांवरील दबाव हे गंभीर समस्या आहेत. प्रशासनाने यावर वेळोवेळी कारवाई करण्याची गरज आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कठोर नियमावली लागू करण्याची मागणी होत आहे. पण या प्रकारामुळे पुण्यातील प्रवासी सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेत आला आहे.