Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी बातमी! न्यायालयाने धनंजय मुंडेंना ‘या’ प्रकरणात ठरवले दोषी

न्यायालयाचा धनंजय मुंडेंना धक्का, पत्नीला द्यावी लागणार इतक्या लाखाची पोटगी, नेमके प्रकरण काय?

बीड – राज्याचे मंत्री व अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणी त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढत असताना आता कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचारामध्ये दोषी ठरवले आहे. त्यामुळे करूणा मुंडे यांना दिलासा मिळाला आहे.

धनंजय मुंडे यांच्या पूर्व पत्नी करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले होते. घरगुती हिंसाचाराचे आरोप करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले होते. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात कौटुंबिक न्यायालयामध्ये हिंसाचाराची केस दाखल केली होती. तसेच करुणा मुंडे यांनी दरमहा १५ लाख रुपये पोटगी देण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने करुणा मुंडेच्या बाजूने निकाल देताना करुणा मुंडे यांना दरमहा २ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे यांना दिले आहे. यातील १ लाख २५ हजार रुपये करुणा मुंडे यांना तर मुलगी शिवानी मुंडेला तिच्या लग्नापर्यंत दरमहा ७४ हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. कोर्टाने धनंजय मुंडे यांना दिलेला मोठा धक्का दिला असून यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. न्यायालयाचे मी खूप आभार मानते. आज सत्याचा विजय झाला आहे. लोकांना असं वाटतं की कोर्टामध्ये न्याय मिळत नाही, पण मला न्याय मिळाला आहे. औरंगाबाद कोर्टामध्ये देखील माझा विजय झाला होता. आता वांद्रे कौटुंबिक न्यायालयामध्ये देखील माझा विजय झाला आहे. त्यामुळे न्यायालयाचे आणि न्यायाधीश यांचे आभार मानते, अशी प्रतिक्रिया करुणा मुंडे यांनी दिली आहे. दरम्यान पहिली पत्नी म्हणून कोर्टाने मला मान्य केलं आहे. करुण शर्मा नको, मला करुणा मुंडे म्हणा. हा माझा अधिकार आहे, मी लढा दिला आहे. मी मोठी किंमत चुकवली आहे. त्यामुळे मला करुणा धनंजय मुंडे म्हणा” अशी विनंती करूणा मुंडे यांनी केली आहे.

कोर्टाला घरगुती हिंसाचाराचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. फक्त आर्थिक परिस्थिती पाहून कोर्टाने पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत, असा दावा धनंजय मुंडे यांच्या वकिलाने केला आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!