नव्या नवरीचा डान्स पाहून नवरदेवासह पाहुणेही चकित
व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, गाणे आणि डान्स पाहून तुम्हीच चकित व्हाल, एकदा बघाच!
पुणे – लग्न ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात खूप सुंदर आणि कोमल आठवण असते. कारण दोन जीव एकदिलाने पुढील वाटचाल करणार असतात. त्यामुळे तो दिवस खास बसवण्यासाठी काहीतरी हटके करण्याचा नवरा नवरीचा प्रयत्न असतो. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो पाहून तुम्ही देखील चकीत व्हाल!
सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत नवरीने भन्नाट डान्स केला आहे, विशेष म्हणजे नवरदेव सुद्धा नवरीचा डान्स पाहून चकित झाला. नवरीने आपल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात नवऱ्यासाठी हा भन्नाट असा डान्स केला आहे. नवरीने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत नवरदेवाला स्टेजवर बोलवून घेतले, आणि ‘खंडोबाला नवस केला लाखात एक पोरगा भेटू दे मला’ या मराठी गाण्यावर भन्नाट डान्स केला. आपण व्हिडीओत पाहू शकतो की, नवरी डान्स करत असून नवरा लाजत आहे. विशेष म्हणजे नव्या नवरीचा डान्स पाहून सासरचे मंडळींही अवाक् झाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर miss_sonuu_2097 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. तर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र लग्नसराईची धामधुम सुरु आहे. सोशल मीडियावरही तुम्हाला लग्न कार्यातील अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी मिळत आहेत. पण सध्या या व्हिडिओला मोठ्या संख्येने नेटकरी वर्गाने पंसती दिलेली आहे.