![Ganesh J GIF](https://maharashtrakhabar.com/wp-content/uploads/2022/08/gif-advt.gif)
मी तोंड उघडले तर धनंजय मुंडे काय पंकजा मुंडेंचेही मंत्रिपद जाईल
धनंजय मुंडे यांच्या पत्नीचा खळबळजनक दावा, फडणवीस आणि अजितदादावरही निशाना, म्हणल्या...
मुंबई – राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील न्यायालयीन वाद आणि त्यावर त्यांचा मुलगा सिशिव मुंडे याने इन्स्टाग्रामवर दिलेली प्रतिक्रिया या सर्वांवरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. पण आता यावर प्रत्युत्तर देताना करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना इशारा दिला आहे.
करूणा मुंडे या मंत्री धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी असून त्यांनी पोटगी म्हणून त्यांना दरमहा २ लाख रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर करूणा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडेंबरोबरच पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या, मुलाने जे सांगितले ते खरे आहे. धनंजय मुंडे यांचे माझ्या मुलांसोबत चांगले नात होते. त्यांच्यामध्ये कोणताही वाद नाही. माझ्या मुला बाळांवरदेखील दबाव येत आहेत. तुम्ही हे समजून घेतले पाहिजे. मुलांना काय वाटते? आणि मुलांच्या वडिलांना वाटते की मी माध्यमांमध्ये बोलू नये, किंवा न्यायालयात जाऊ नये, असे त्यांना वाटते. तसेच मी वाईट महिला आहे, हे मी मान्य करते. अनेक मोठ्या गोष्टी आहेत. मी तोंड उघडलं तर पंकजाताईंचं पण मंत्रिपद जाऊ शकते. धनंजय मुंडेच नाही तर पंकजा मुंडे यांचे देखील पद जाईल. असा इशारा त्यांनी दिला. मी २७ वर्ष झाले तुमची पत्नी आहे, तरीही हे सगळं विसरुन कटकारस्थान धनंजय मुंडे माझ्याविरोधात रचतोय. मी एकच बोलते, मला बोलायचं असेल आता तर कॅबिनेटमध्ये येऊन बोलेल. तुम्ही मला रोडवर सोडू शकत नाही, मी तुमची बायको आहे, असेही करुणा मुंडे म्हणाल्या आहेत.
माझ्या आईच्या निधनाच्या वेळी माझ्या कुटुंबावर दबाव आणण्यात आला. माझ्या बहिणीने केस केली तेव्हा मला पाठिंबा देऊ नको, असे सांगण्यात आले. आता माझ्या मुलांना माझ्याविरोधात उभे करत आहेत. असाही दावा करुणा मुंडे यांनी केला आहे.