
दारू पिऊन तरूणीचा मध्यरात्री भररस्त्यात धिंगाना
पोलीसांशी हुज्जत घालणार्या या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, म्हणाली काय त्रास होतोय....
नाशिक – नाशिकमध्ये रात्री उशीरा पार्टीवरून परतणाऱ्या मद्यधुंद तरुणीने भररस्त्यात पोलिसांनी वाद घातल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तसेच या तरूणीने पोलीसांशी देखील हुज्जत घातली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुणी मद्यधुंद होऊन रस्त्यावर गोंधळ घालत आहे. यावेळी तिचा व्हिडिओ काढणाऱ्याला ती व्हिडिओ का काढत आहे? असा प्रश्न विचारत आहे. तरुणी मद्यधुंद अवस्थेत तिच्या मित्राला तेथून जाऊ, असे बोलते. तरुणीसोबत असलेला तिचा मित्र तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. परंतु, ती कोणाचेही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हती. वरून ती तरुणी पोलिसांना उद्धटपणे बोलताना म्हणते की, व्हिडिओ करण्याचे काही कारण नाहीये. आम्ही तुम्हाला काही करत नाहीये, आम्ही दूर थांबलो आहोत. आम्ही नशेत आहोत, आम्ही दारू पिऊन आलो आहोत, तुम्हाला काय त्रास होतोय.’ पोलीसांनाही त्या तरूणीने मद्यपान केल्याचा संशय होता. दरम्यान, तरुणीच्या मित्राने मद्यपान केले होते की नव्हते, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. हा व्हिडिओ @NCMIndiaa या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.
https://x.com/NCMIndiaa/status/1889695345623318623?t=uZhl9Kr1pJECZchyfPTAfQ&s=19
पोलिसांना अरेरावी करण्याचा प्रकार झाल्याने यानंतर महिलांची कुमक मागविण्यात आली. त्यानंतर ड्रग्स घेतलेल्या या तरुणींना पोलीस ठाण्यात घेऊन जात समज देण्यात आली. मात्र सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे.