Latest Marathi News
Ganesh J GIF

अपंग कोट्यातून अधिकारी झालेल्या महिलेचा उड्या मारत डान्स

गाण्यावर केलेल्या डान्सचे व्हिडीओ व्हायरल, घोटाळ्याचा आरोप, ती अधिकारी म्हणते डान्स करायला आवडतो

मुंबई – दिव्यांग कोट्यातून बोगस आयएएस अधिकारी झालेल्या पूजा खेडकरचे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्याचबरोबर सरकारच्या भोंगळ कारभाराचे देखील वाभाडे निघाले होते. पण पूजा खेडकर प्रकरण ताजे असताना आता प्रियंका कदमचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

दिव्यांग कोट्यातून तीन वर्षांपूर्वी भरती झालेल्या अधिकाऱ्याच्या डान्सचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या अधिकारी महिलेचे नाव प्रियंका कदम आहे. हाडांच्या आजारामुळे अपंग कोट्यातून निवड झालेल्या प्रियांका कदम यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, लोकसेवा आयोगाच्या भरतीत हेराफेरी आहे का? असा आरोप राष्ट्रीय सुशिक्षित युवा संघाने केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रियांका कदमच्या व्हिडिओमध्ये ती केवळ नाचत नाही तर पूर्णपणे ऍक्टिव्ह देखील दिसत आहे. एका व्हिडिओमध्ये ती ढोलकीच्या तालावर नाचताना दिसत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती डीजेच्या फ्लोअरवर नाचताना दिसत आहे. एवढेच नाही तर काही व्हिडिओंमध्ये ती धावतानाही दिसते. जर ती शारीरिकदृष्ट्या अपंग असेल तर ती हे सर्व इतक्या सहजपणे कसे करू शकते?असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. राज्यातील पूजा खेडकर प्रकरणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. यानंतर आयोगच खडबडून जागे झाले होते. अशा प्रकरणांची चौकशी केली जात होती. आता प्रियंका कदमचे प्रकरण देखील समोर आले आहे. आता या प्रकरणी सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

या सर्व आरोपानंतर आता प्रियंका कदमने आपली बाजू मांडली आहे. तिने याबाबत एक्सरे रिपोर्ट दाखवताना, कंबरेजवळ पायाचे हाड खराब झाल्याचे सांगितले आहे. तर ऑपरेशन करून त्यात रॉड बसवण्यात आल्याचे स्पष्टीकरण प्रियंका कदम यांनी दिले आहे. दिव्यांगचा अर्थ व्हिलचेअरवर बसणे असा होत नाही, असेही प्रियंका कदमने म्हटले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!