
कमालच! पोलीस ठाण्यात तरुणीची पोलीसांनाच बेदम मारहाण
सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल, पोलीसांनीही दाखवला पोलीसी खाक्या, फ्री स्टाईल हाणमारी बघाच!
मुंबई – सोशल मीडियावर रोज विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओंमध्ये डान्स, गाणी, रील्स अशा विविध मनोरंजन करणाऱ्या गोष्टी असतात तर काही व्हिडीओमध्ये मात्र संताप आणणाऱ्या देखील असतात.
पोलीसांसोबत वाद होण्याच्या घटना अलिकडच्या काळात वाढल्या आहेत. महिला देखील यात मागे नाहीत त्या देखील पोलीसांसोबत हुज्जत घालण्याबरोबर मारामारी करायला मागेपुढे पाहत नाहीत. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, पोलिस ठाण्यामध्ये एका आरोपी तरुणीला खुर्चीवर बसवण्यात आलं असून यावेळी तिच्या बाजूला काही महिला पोलिस उभ्या होत्या, यावेळी त्यातील एक महिला पोलिस तिला केलेल्या गुन्ह्याबद्दल प्रश्न विचारते. यावेळी ती तरुणी काहीही उत्तर न देता सरळ महिला पोलिसाच्या पोटावर लाथ मारते. तिने लाथ मारताच सर्व महिला पोलिस तरुणीला घेरतात आणि तिला मारायला सुरुवात करतात. त्यानंतर ती तरुणी दुसऱ्या महिला पोलिसालाही लाथ मारून तिचा गणवेश ओढण्याचा प्रयत्न करते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @gavthi_mungla_या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून अनेकांनी तो पाहिला आहे. तसेच प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत
अनेकांनी तरुणीच्या वागण्यावर संताप व्यक्त केला आहे. तिच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या सोशल मिडीयावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.