
बॉडीबिल्डर नवरी सोशल मिडियावर तुफान व्हायरल
लग्नातील व्हिडिओ व्हायरल, कोण आहे बॉडीबिल्डर नवरी? सासरचे घाबरले?
बेंगलोर – सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका तरुणी वधूच्या वेशात सजली आहे. पण तिची मजबूत शरीरयष्टी पाहून लोक आश्चर्यचकित होत आहेत. कारण लग्न एका बाॅडीबिल्डर तरूणीचे आहे.
व्हायरल व्हिडिओतील वधूचे नाव आहे चित्रा पुरुषोत्तम. चित्रा ही कर्नाटकातील एक लोकप्रिय बॉडीबिल्डर आहे. जिने अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा जिंकल्या आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने मिस इंडिया फिटनेस अँड वेलनेस, मिस साउथ इंडिया मिस कर्नाटक (5 वेळा विजेती), मिस बेंगळुरू आणि मिस म्हैसूर वोडेयार या किताबाने तिला गौरविण्यात आलेले आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की ती पारंपारिक कांजीवरम साडी आणि गुंतागुंतीच्या दागिन्यांमध्ये परिधान केलेली, ती अभिमानाने तिच्या सुस्पष्ट स्नायूंचे प्रदर्शन करते, पारंपारिक पद्धतींपेक्षा वेगळी वधूचा लूक सादर करते. या व्हिडिओमुळे ऑनलाइन प्रतिक्रियांचा वर्षाव झाला आहे. अनेक वापरकर्त्यांनी तिच्या फिटनेस आणि आत्मविश्वासाचे कौतुक केले आहे, तर काहींनी विनोदाने प्रतिक्रिया दिल्या आहेत. संपूर्ण सासरचे घर घाबरले आहे!”, तर कोणीतरी म्हटले, “या सुनेला गळ्यातील दागिन्यांसह पदके असायला हवी होती.” तर काहींनी घाबरण्याची गरज नाही, मुलीने इतके उत्तम शरीरयष्टी निर्माण केली आहे याचा अभिमान बाळगण्याची गरज आहे, असे मत मांडले आहे. दरम्यान चित्राचे इंस्टाग्रामवर १ लाख २६ हजार फॉलोअर्स आहेत. तिच्या रिल्सला लाखो व्ह्यूज मिळत असतात.
चित्राचा व्हिडिओ एक ट्रेंडिंग विषय बनला आहे, ज्यामुळे सौंदर्य मानके, फिटनेस आणि आत्मविश्वास याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. महत्वाचे म्हणजे वधूच्या लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.