
ते दोघे बागेत एकत्र भेटले आणि तिथेच नको ते घडले
अजब प्रेमाच्या गजब कहाणीची जोरदार चर्चा, प्रेयसीला भेटणे महागात पडले, पहा काय घडले
पुर्णिया- सोशल मिडियामुळे जग खूप जवळ आले आहे, असे म्हणतात अनेक मित्र देखील येथे बनतात. त्याचबरोबर अनेकांचे प्रेम देखील सोशल मिडीयामुळे जुळल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता एक धक्कादायक माहिती घटना समोर आली आहे. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील फलका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आमोल गावाची आहे. पूर्णिया जिल्ह्यातील रहिवासी रवी आणि आमोल गावातील काजल यांची ओळख फेसबुकवर झाली. मग त्यांच्यात संवाद सुरु झाला. आणि त्यानंतर त्यांनी एकमेकांचे नंबर एक्सचेंज केले. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली. आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर त्यांनी एकमेकांना भेटायचे ठरवले. यासठी त्यांनी कटिहारमधील कोढा पार्कमध्ये भेटण्याचे निश्चित केले. त्यांनी भेट होताच मनमोकळेपणाने गप्पा मारल्या आणि सोबत फोटो आणि सेल्फी घेतली. पण गावकऱ्यांनी त्यांना एकत्र पाहिल्यानंतर चक्क लग्नच लावून दिले आहे. दोघांनी सर्वांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र कुणीही त्यांचं ऐकून घेतलं नाही. गावकरी आणि कुटुंबीयांच्या दबावामुळे त्याच वेळी दोघांचं मंदिरात लग्न लावून देण्यात आले.
लग्नाला मुलाच्या बाजूने कुणीही उपस्थित नव्हते. फक्त सोबत काढलेले फोटो पाहून गावकऱ्यांनी शंका उपस्थित करत लग्न लावून दिल्याने याची परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे. आता हे प्रेमी जोडपे एकत्र भेटल्याने अडचणीत आले आहे.