Latest Marathi News
Ganesh J GIF

‘दादा, काय करायचे ते कर पण मला जिवंत ठेव’

म्हणून तरूणीने आरडाओरडा केला नाही, पीडित तरूणीचा धक्कादायक खुलासा, गाडेचा निर्लज्जपणा समोर

पुणे – स्वारगेट एसटी आगारात गेल्या आठवड्यात एका २६ वर्षांच्या तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पुणे पोलिसांनी शिरुर जिल्ह्यातील गुनाट गावात ऊसाच्या फडात शोधमोहीम राबवून नराधम दत्तात्रय गाडे याला अटक केली होती. पण आता या प्रकरणाबाबत रोज नवीन खुलासे समोर येत आहेत.

दत्ता गाडे याला अटक केल्यानंतर त्याने तरुणीवरच आरोप केले होते. मी तरुणीला शरीरसंबंध ठेवण्यासाठी पैसे दिले होते, असा दावा त्याने केला होता. त्याचबरोबर मी समलिंगी असल्याचेही त्याने सांगितले होते. पण आता पोलीस तपासात खरी माहिती समोर आली आहे. अत्याचारावेळी दत्तात्रय गाडे याने आपल्याला जिवंत सोडावे, या एका कारणासाठी तरुणीने प्रतिकार केला नाही. प्रत्यक्षात ही तरुणी जीवाच्या भीतीने गप्प राहिली आणि तिने आरडाओरडा केला नसल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. तरुणी बसमध्ये गेल्यानंतर दत्तात्रय गाडे याने बसचा मुख्य दरवाजा आणि चालक व प्रवाशांमध्ये असलेला दुसरा दरवाजाही बंद केला. त्यानंतर पीडितेने बसमध्ये कोणीच नसल्याचे पाहून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र, दत्तात्रय गाडे याने तिला सीटवर ढकलून दिले. पिडीत तरुणीने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र, बसच्या काचा बंद असल्याने आवाज बाहेर आला नाही. त्यानंतर दत्तात्रय गाडे याने पीडितेचा गळा दाबला. त्यामुळे ही तरुणी प्रचंड घाबरली. आपल्याला जिवंत सोडावे, यासाठी ही तरुणी दत्तात्रय गाडे याच्याकडे याचना करु लागली. याचाच फायदा घेऊन दत्तात्रय गाडे याने तरुणीवर दोनवेळा अत्याचार केला. तरुणीचे फलटणला जायचे तिकीट ही पोलिसांकडे पुरावा म्हणून जमा केलं होतं. एसी एसटीला खिडक्या नसल्याने बाहेर आवाज येत नसल्याचंही निष्पन्न झालं. पोलिसाकडून बसमध्ये चढून आवाज बाहेर येतो की नाही याची ही तपासणी करण्यात आली.वैद्यकीय समुपदेशक असल्याने वेस्ट बंगालच्या घटनेप्रमाणे आपल्याला ही मारून टाकतील अशी पीडीतेला भीती होती. त्यामुळेच दादा मारू नको अशी विनंती पीडितेनं आरोपीकडे केल्याचा जबाब तिने पोलिसांना दिला आहे. त्यामुळे गाडेच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान आरोपी दत्ता गाडे याच्या बँक खात्यात फक्त २४९ रुपये आढळून आले आहेत. मग आरोपीच्या वकिलाने दावा केलेले ते ७ हजार ५०० रुपये कुठून आले, याचा तपास आता पुणे पोलीस करत आहेत.

आरोपी निर्दोष असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी करत पीडितेवर अत्यंत गंभीर आरोप लावले होते. त्यापैकी वकिलांनी केलेला एक दावा खोटा असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे आगामी सुनावणीकडे लक्ष असणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!