
शेवाळेवाडी पीएमटी स्थानकातील धक्कादायक प्रकार उघडकीस
स्वारगेट स्थानकाप्रमाणे शेवाळेवाडीतही नादुरुस्त बस, बस स्थानक बनले दारुड्यांचा अड्डा
पुणे – स्वारगेट बसस्थानकात एका तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर महिला सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे. पण एसटी बस स्थानका प्रमाणे पीएमटी स्थानकांवरील सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला आहे.
हडपसरच्या पुढे शेवाळेवाडी बसस्थानक असून हा परिसरात सुमारे साडेसात एकरचा आहे. सध्या तेथे अनेक भंगार बस उभ्या असल्याचे दिसून आले आहे. तसेच पीएमपीएमएलच्या कंत्राटी बसही रात्रीच्या वेळी येथे उभ्या केल्या जात असून या बसचे दरवाजे आणि खिड्क्या लॉक करण्याची कुठलीही काळजी घेतली जात नसल्याचे समोर आला आहे. माजी नगरसेवक योगेश ससाणे आणि सावली संस्थेच्या सदस्यांनी शेवाळेवाडी डेपोची पाहणी केली. यावेळी मेनगेट वरील सुरक्षा रक्षक साठी कसलीही सुविधा उपलब्ध नाही. संपुर्ण डेपो मध्ये प्रकाश व्यवस्था अंशता: चालु आहे. सुमारे पाच हायमास्ट खांब आहेत परंतु सर्व बंद आहेत. सगळी कडे अंधाराचे साम्राज्य पहायला मिळते.
सार्वजनिक स्वच्छता गृहात पाणीच नाही. डेपो मध्ये कोणीही कधीही मुक्त प्रवेश करु शकतो. भंगार गाड्या, नादुरुस्त वाहने बेशिस्तपणे लावण्यात आली आहेत. रात्री मुक्कामी असलेल्या गाड्यांचे दरवाजे सताड उघडे होते. कंत्राटी गाड्याचा डेपो अंतर्भूत दिला असल्यामुळे रात्री अपरात्री कोणीही येऊ शकते, त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. कर्मचाऱ्यांसाठी साधी पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे. तसेच्या येथे वेश्या व्यवसाय होत असल्याचाही प्रकार समोर आला आहे. त्यामुळे याबाबी पीएमपीएमएल आयुक्त आणि मनपा आयुक्तांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे ससाणे म्हणाले आहेत.
https://www.facebook.com/share/p/154Mjx8btq/
https://www.facebook.com/share/p/154Mjx8btq/
भविष्यातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी देखील मागणी होऊ लागली आहे. पण अनेक त्रुटी आढळून आल्याने पीएमपी प्रशासन अनुवित प्रकार होण्याची वाट बघत आहे का? , असा प्रश्न उपस्थित होत आहे.