Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात टोळक्याकडून तरूणाला बेदम मारहाण

हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, हे ठरले मारहाणीचे कारण, पोलीस काय करतायतं?

पुणे – गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहेत. बलात्कार, खून देखील होत असून रस्त्यावरील हाणामारी तर आता नित्याची झाली आहे. आता पुन्हा एकदा कोथरुड परिसरात हाणामारीची घटना उघडकीस आली आहे.

पुण्यातल्या कोथरूड भागात एका तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. गाडी आडवी घातल्याचा कारणास्तव एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या मध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अक्षय लोणकर असे जखमी झेलल्या तरुणाचे नाव आहे. तर मारहाण केल्याबद्दल सचिन मिसाळ आणि त्याच्या साथीदारांवर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोथरुड मधील एमआयटी कॉलेजच्या गेट समोर गाडी आडवी लावण्याच्या कारणातून या आरोपींचा अक्षयसोबत वाद झाला होता. याच वादातून सचिन मिसाळने आपल्या काही साथीदारांसह अक्षयवर हल्ला केला. पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या असून इतर आरोपींचा शोध. घेतला जात आहे. सचिन मिसाळ असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे गुन्हेगारी वाढत असल्याची चर्चा सुरू आहे.

 

कोथरुडमध्ये काही दिवसांपूर्वी मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली होती. त्या घटनेला महिना उलटत नाहीत तोच टोळक्याकडून एका तरुणाला मारहाण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!