Latest Marathi News
Ganesh J GIF

गरम सळईचे चटके दिल्याने तरूणाचा तडफडून मृत्यू

विवस्त्र अवस्थेत मृतदेह सापडल्याने खळबळ, नेमक कारण काय? गुन्हेगारीचा राज्यात उच्छाद

सोलापूर – जालना येथे एका तरूणाला सळईचे चटके दिल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती. आता अशीच घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. माळशिरसमध्ये एका तरुणाला नग्न करून चटके देऊन त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील आकाश अंकुश खुर्द – पाटील या तरुणाचा माळशिरस पिलीव रोडवरील वनविभागाच्या क्षेत्रात निवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या शरीरावर लोखंडी सळईने चटके दिल्याचे व्रण आढळून आले आहेत. तोंडातून रक्त आलेले आहे. त्याच्या मृतदेहा शेजारी त्याची मोटरसायकल आढळून आली आहे. या घटनेमुळे पिलीव परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. हा सगळा प्रकार अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी माळशिरस पोलिसांनी एका तरुणीस व अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. अद्याप आकाशची कोणी हत्या केली याबाबत माहिती मिळालेली नाही. दरम्यान आकाशच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पिलीव औट पोस्टचे पोलीस कर्मचारी यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. अजून शवविच्छेदनाचा अहवाल आला नसून यानंतर मृत्यूचे कारण समोर येऊ शकणार आहे.

आकाश हा त्याची आई, पत्नी आणि ७ महिन्याच्या मुलासह राहत होता. या हत्येचा पोलीस अधिक तपास करत असून त्यांनीही अजूनही कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण, यामुळे पुन्हा एकदा राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!