
दिराचा हटके डान्स पाहून वहिनी लाजेने झाली लाल
अनपेक्षित कृतीने पाहुणेही थक्क, गाण्यातून दिराने वहिणीकडे केली 'ही' मागणी, एकदा बघाच
पुणे – लग्न आणि डान्स हे अलिकडे समीकरणच बनले आहे. आता प्रत्येक लग्नात नातेवाईक किंवा घरातील सदस्य डान्स करत असतात. कधी कधी तर नवरा बायको देखील डान्स करून अनेकांना चकीत करत असतात. सध्या सोशल मिडीयावर एक हटके डान्स व्हायरल होतोय.
मोठी वहिनी आणि लहान दिर या नात्याला अनेक छटा आहेत. यात आईची माया आणि मैत्रीची भावना देखील आहे. मोठी वहिणी ही लहान दिराची आई तर कधी मैत्रीण देखील बनत असते. आजवर आपण दिराचं लग्न असलं की वहिनीचा मोठा थाट असलेले व्हिडीओ पाहिलेले आहेत. तसेच लग्नात डान्स करण्यातही वहिनी पुढेच असते. जर भाऊ मोठा असेल तर त्याच्या बायकोशी लहान दिराचे नातेही खासच असते, अशाच एका दिराचा आणि वहिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर साखरपुड्यातील एक डान्स व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात दीराने आपल्या होणा-या वहिनीसाठी जबरदस्त डान्स केला आहे. व्हिडिओत दिसत आहे की, एक तरुण स्टेजवर वहिनीसोबत डान्स करत आहे. तो ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटातील ‘धिक ताना धिक ताना’ या गाण्यावर वहिनीसमोर डान्स करत आहे. हे गाणे म्हणत त्याने आपल्या लग्नाची देखील गोष्ट वहिनीसमोर मांडली आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ sharvari_mardhekar नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी या बाँडिंगचे काैतुक केले आहे. सध्या लग्नाचा सीझन असल्याने अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत.