Latest Marathi News
Ganesh J GIF

या अभिनेत्रीमुळे दिशा सालियन मानसिक तणावात होती

मालवणी पोलीसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे, वडीलही आत्महत्येसाठी कारणीभूत?

मुंबई – दिशा सालियान मृत्यूप्रकरणात वेगवेगळी माहिती समोर येत आहे. सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियान यांनी केला होता. पण त्यानंतर मालवणी पोलीसांनी वडीलांच्या अफेअरमुळे आत्महत्या केल्याची नोंद झाल्याची चर्चा होत होती. पण आता वेगळीच माहिती समोर आली आहे.

केली. त्यानंतर आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. मालवणी पोलिसांनी यापूर्वीच दिशा सालियान मृत्यूप्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. या क्लोजर रिपोर्टमध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे आहेत. पोलिसांनी दोन सेलिब्रेटींचा जबाब नोंदवला होता. त्यात आता अभिनेता मिलिंद सोमण यांचा जवाब समोर आला आहे. दिशा सालियान काम करत असलेल्या कॉर्नरस्टोन कंपनीच्या जाहिरातीशी थेट सबंधित असलेल्या मिलिंद सोमण आणि दिशा पटणीचा यांचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवला होता. दिशा पटणी आणि मिलिंद सोमण यांनी कॉर्नरस्टोन या कंपनीशी दोन वेगवेगळ्या जाहिरातींसाठी करार केला होता. या दोन्ही सेलिब्रेटींशी संवाद ठेवण्याची आणि बोलणी करण्याची जबाबदारी दिशा सालियनवर होती. करारात नमूद नसलेल्या गोष्टी करायला सांगितल्या जात असताना दिशा पटानीने नकार दिल्याने दिशा सालियन टेन्शनमध्ये होती. त्याचबरोबर मिलिंद सोमणने एका मोबाईल कंपनीची जाहिरात या कंपनीसोबत केली होती. मात्र करार संपल्यानंतर त्यांनी एक ट्विट केल होत. या ट्विटमुळे कंपनी अडचणीत आली होती. पण सोमण यांनी ट्विट मागे घेण्यास नकार दिला होता. कॉर्नरस्टोन कंपनीशी सबंधित या दोन बाबींमुळे दिशा तणावात होती, असा जवाब नोंदवला होता. त्याचबरोबर वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे ती संबंधितांना सातत्याने पैसे देत होती, ज्यामुळे ती मानसिक तणावात गेली होती. या तणावातूनच तिने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा निष्कर्ष आहे.

वडिलांच्या अफेअरबद्दलची माहिती, कंपनीच्या डील करण्यात अपयशी आणि काही आर्थिक बाबींच्या त्रासामुळे दिशा त्रस्त होती. म्हणून दिशाने आत्महत्या केल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये मुंबई पोलिसांचा निष्कर्ष आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!