
धक्कादायक! मुलांसमोरच दोन शिक्षिकेची जोरदार हाणामारी
हाणामारीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल, हाणामारीत मुलेही सहभागी, कारण काय?
मथुरा – उत्तर प्रदेशातील मथुरा येथील एका प्राथमिक शाळेमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि निंदनीय प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतील एका सहाय्यक शिक्षिका आणि अंगणवाडी सेविकेमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान भीषण हाणामारीत झाले आहे.
ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर वेगाने पसरत आहे. या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सहाय्यक शिक्षिका प्रीती तिवारी यांची चंद्रावती या अंगणवाडी सेविकेसोबत एका मुद्द्यावरून वादावादी झाली. वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले आणि दोघींनी एकमेकींवर हल्ला चढवला. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये त्या एकमेकींचे केस ओढताना, कानाखाली मारताना आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, या भांडणात काही लहान मुलेही सामील झाली असून, त्यांनीही महिलांना लाथा मारल्याचे दिसते.शाळेतील विद्यार्थ्यांसमोरच शिक्षिका आणि अंगणवाडी सेविकेमधील भांडण झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नसून, तक्रार दाखल झाल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.ही घटना शाळेतील शिस्त आणि सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर असून, यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. प्रीती तिवारी यांच्या विरोधात यापूर्वीही अशाच प्रकारच्या तक्रारी आल्याचे अहवालात म्हटले आहे.
या घटनेची दखल घेत मूलभूत शिक्षण अधिकाऱ्यांनी ब्लॉक शिक्षण अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, हाणामारीत अंगणवाडी सेविका चंद्रावती यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना फरीदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.