Latest Marathi News
Ganesh J GIF

नराधम बायकोची नवऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण

मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल, सासू आणि मेव्हण्याकडूनही त्रास, 'यासाठी' बायकोची मारहाण, पतीला अश्रू अनावर

भोपाळ – महिला अत्याचाराचा अनेक घटना आपण पाहिल्या किंवा ऎकल्या आहेत. पण अलीकडे पुरुषांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत. आता मध्यप्रदेशमधील एका लोको पायलटला पत्नीने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मध्य प्रदेशमधील सतना जिल्ह्यातील हे घरगुती हिंसाचाराचं प्रकरण आहे. सतना रेल्वे विभागात लोको पायलट म्हणून तैनात असलेले लोकेशला त्याची पत्नी हर्षिता रायकवार, सासु आणि पत्नीच्या भावाकडून मारहाण करण्यात आली आहे. लोकेश आणि हर्षिताचं जून २०२३ मध्ये लग्न झाले आहे. लग्नानंतर लगेचच पत्नी, सासू आणि मेहुण्याने लोकेशकडे पैसे आणि सोने-चांदीची मागणी करण्यास सुरुवात केली. यासाठी त्याचा मानसिक आणि शारीरिक छळही करू लागले. लोकेशने सांगितलं की, लग्न झाल्यापासून त्याची पत्नी हर्षिता त्याला त्याच्या घरच्यांना भेटू देत नव्हती. कोणालाही घरी येऊ देत नव्हती, मित्रांना भेटू देत नव्हती. नेहमी शिवीगाळ करते आणि मारहाण करत असे. याआधीही लोकेशने अनेक ठिकाणी तक्रार केली, पण त्याचा होत असलेला छळ तो सिद्ध करु शकत नव्हता. त्यानतंर त्याने घरात छुप्या कॅमेऱ्याची मदत घेत मारहाणीचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर त्याने पुन्हा पोलीसांकडे मदतीची मागणी केली आहे. त्याने याबाबत पन्ना येथील पोलीस अधीक्षकांच्या पत्र लिहून पत्नीपासून वाचवण्याची विनंती केली आहे. पोलीस अधीक्षकांनी मदतीचे आश्वासन दिले आहे.

 

लोकेशने आरोप केली का हर्षिता त्याला नेहमी मारहाण करते. खोटे खटले दाखल करत आत्महत्या करण्याची धमकीही देत असे. याप्रकरणी पोलिसांना गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!