
दत्ता गाडे आणि तरुणीमध्ये संमतीनेच संबंध झाले
गाडेच्या वकिलाचा धक्कादायक दावा, जामीन अर्जात केले मोठे गाैप्यस्फोट, पोलीसांवरही प्रश्नचिन्ह?
पुणे – पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात २५ फेब्रुवारीला एका तरुणीवर एसटी बसमध्ये बलात्कार करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी दत्तात्रेय गाडे याला अटक केली होती. आता दत्तात्रय गाडेच्या वकिलांनी याबाबत धक्कादायक दावा केला आहे.
गाडेचे वकील वाजिद खान-बिडकर याने गाडेच्या जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला असून त्यामध्ये धक्कादायक दावा केला आहे. यामध्ये शारीरिक संबंधाची वेळ हा वैद्यकीयरीत्या प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. पीडितीमध्ये आणि आरोपीमध्ये जे शारीरीक संबंध झाले ते जबरदस्तीने नाही तर संमतीने झाले आहेत. पीडितीने जो जबाब दिला आहे त्यामध्ये जबरदस्तीने संभोग करणे म्हटले आहे. मात्र, ते अशक्य आहे. जे काही संबंध झाले ते संमतीनेच झालेत आणि संमतीने झालेले संबंध हा कुठलाही गुन्हा नाही, असा दावा करत जामीनासाठी अर्ज केला आहे. त्याचबरोबर दर तासाला फलटणसाठी गाडी आहे, हे माहिती असून देखील फिर्यादी अनोळखी माणसासोबत जाणे ही बाब अशक्य आहे, असेही जामीन अर्जात लिहिले आहे. आरोपीच्या वकिलांनी जामीन अर्जात पीडितेच्या जबाबातील काही मुद्द्यांवर आणि तत्कालीन परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अर्जानुसार, पीडितेने तिच्या फिर्यादीत म्हटले होते की, तिच्या बाजूला एक वयस्कर व्यक्ती बसली होती आणि ती देखील त्याच बसने प्रवास करणार होती. मग ती वयस्कर व्यक्ती पीडितेसोबत किंवा आरोपीसोबत का गेली नाही? यावरून संशय निर्माण होत असल्याचे अर्जात म्हटले आहे. स्वारगेट स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही, पोलिसांनी अद्याप संबंधित फुटेज न्यायालयात सादर केलेले नाही. यावरून आरोपीने कोणतीही गैरकायदेशीर कृती केली नाही, हे सिद्ध होते, असा दावा गाडेच्या वकिलांनी केला आहे. आता न्यायालय या अर्जावर काय निर्णय देणार याकडे लक्ष लागले आहे.
स्वारगेट एसटी स्थानकात बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी पथके तयार करून शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून आरोपी दत्तात्रय गाडे याला ताब्यात घेण्यात आले होते. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.