
मोठी बातमी! देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार?
सरकारकडून उत्पादन शुल्कात इतक्या रुपयांची वाढ, सर्वसामान्यांवर नेमका काय परिणाम होणार?
दिल्ली – केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. कारण अचानक पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण यामुळे इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
सोमवारी सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या एक्साईज ड्युटीमध्ये अर्थात उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क २ रुपयांनी वाढलं आहे. तर डिझेलवर देखील २ रुपये उत्पादन शुल्क वाढवण्यात आलं आहे. त्यामुळं पेट्रोल-डिझेलच्या दरात सोमवारी मध्यरात्री १२ वाजल्यानंतर वाढ होणार अशी चर्चा होती. पण पंपांवरील किरकोळ विक्रीच्या दरात कुठलीही वाढ होणार नसल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारने सोमवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. हे बदल मंगळवारपासून लागू होणार आहेत. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर १३ रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपये करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे. नवीन बदल ८ एप्रिल २०२५ पासून लागू होतील. तथापि, याचा सामान्य लोकांवर कोणताही परिणाम होणार नाही. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ट्विट केले आहे की, तेल विपणन कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर वाढवू नयेत असे निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला, भारताने विंडफॉल कर देखील रद्द केला होता. सध्या सोमवारी नवी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपये प्रति लिटर असून मुंबईत पेट्रोलची किंमत ₹ १०४.२१ प्रति लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर ₹ १०३.९४ आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत १००.७५ रुपये प्रति लिटर आहे.
भारतात पेट्रोल आणि डिझेल रिफायन केले जातात आणि जेव्हा ते रिफायनरीमधून बाहेर पाठवले जातात तेव्हाच त्यावर उत्पादन शुल्क आकारले जाते. हा कर राज्य सरकारला नाही तर थेट केंद्र सरकारला जातो. उत्पादन शुल्क एका निश्चित रकमेत आकारले जाते, जसे की पेट्रोलवर प्रति लिटर ₹ १९.९०, टक्केवारीत नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीचा मोठा भाग या शुल्कातून येतो, जो देशाच्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे.