
नवऱ्यासोबत राहण्यावरुन दोन बायकांची भररस्त्यात हाणामारी
हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल, दोन बायकांचा जोरदार राडा, झिंज्या ओढताना ओलांडली मर्यादा
मेरठ – दोन बायका फजिती ऎका ! अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. तसेच यावर अनेक चित्रपट देखील आलेले आहेत. पण तरीही अनेकजण दोन दोन लग्न करतात, पण त्यामुळे कधी कधी अवघड परिस्थिती निर्माण होते. आता अशाच एका प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
चित्रपटात दोन लग्न केलेल्या हिरोची होणार त्रेधातिरपीट आपण पाहिली आहे. पण प्रत्यक्ष जीवनात मात्र अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीला दोन बायका आहेत. एकदा पती आपल्या दुसऱ्या बायकोसोबत बाहेर गेला होता, त्यावेळी पहीली बायको देखील तिथे आली होती. पतीसोबत दुसऱ्या बायकोला बघून पहिली बायको भयंकर संतापते. ती नवऱ्याला तिथेच मारायला सुरुवात करते. हे पाहताच दुसरी बायको त्याच्या पहिल्या बायकोच्या अंगावर धावून येते. त्या एकमेकींचे केस ओढतात. भर रस्त्यात दोघींनीही अक्षरश: हद्दच पार केलीय. दोघीही एकमेकींवर अक्षरश: तुटून पडल्याचे व्हिडिओत दिसत आहे. रागाच्या भरात महिला कपडे फाडत असल्याचं आणि जमिनीवर लोळण घेत असल्याचंही दिसत आहे. रस्त्यावरील नागरिक या दोघींना वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्या दोघी काहीही ऐकून घ्यायला तयार नाहीत. या घटनेमुळे रस्त्यावर गोंधळ उडाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया एक्सवरील @@lalluram_news या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. याआधीही नवरा-बायकोमध्ये भररस्त्यावरील हाणामारीचे तसेच वादावादीचे व्हिडिओ तूफान व्हायरल झाले आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://x.com/lalluram_news/status/1914927604987224536?t=J77szFkdeKh_K2ZDGPZePA&s=19
हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘भररस्त्यात असा तमाशा करण्याची गरज काय ?’ असा प्रश्न एका युजरने विचारला आहे. दुसऱ्या युजरने म्हटलं की, ‘एकमेकींना मारण्यापेक्षा नवऱ्याला मारा’. काही नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही जणांनी संताप व्यक्त केला आहे.