
फोन जप्त केला म्हणून विद्यार्थीनीची शिक्षिकेला मारहाण
धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, थेट चप्पलेनं केली शिक्षिकेची धुलाई, धक्कादायक कारण?
हैद्राबाद – मोबाईलचे वेड दिवसेंदिवस लोकांमध्ये वाढतच आहे. लहान लहान मुलांमध्येही याचे वेड दिसून येते. लहान मुलांनाही मोबाईल फोनचे इतके व्यसन लागले आहे की ते जास्त काळ त्यापासून दूर राहू शकत नाहीत. त्यामुळे अनेक दुष्परिणाम लहान मुलांवर होत आहेत.
मोबाईल आता केवळ संवादाचे माध्यम राहिलेले नसून, वेळ तपासणे, ठिकाण शोधणे, अलार्म सेट करणे, तिकिटे बुक करणे यांसाठी अशा अनेक गोष्टींसाठी मदत करतो. परंतु, या वाढलेल्या स्क्रीन-टाइमचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच मुले वायाही जातात. पण ते कोणत्या टोकाला जाऊ शकतात याची प्रचीती देणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना आंध्र प्रदेशमधील रघु इंजीनियरिंग कॉलेजमध्ये घडली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की, एक तरुणी शिक्षिकेचा पाठलाग करत तिच्याकडून आपला मोबाईल फोन परत मिळवण्याचा प्रयत्न करते आहे. शिक्षिका काही पहिल्याच विनंतीमध्ये मोबाईल परत देणार नाही तरीही ही विद्यार्थी विनंती करत पण ती ऐकत नाही. पण तरूणी अजिबात नम्रपणा दाखवत नव्हती. तिने पायातली चप्पल काढली अन् ती थेट शिक्षिकेवर तुटून पडली. चपलेने शिक्षिकेला मारहाण केली. दरम्यान शिक्षिकेने देखील प्रतिहल्ला केला पण तोपर्यंत तिनं शिक्षिकेला खूप मारहाण केली होती. हा प्रकार पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तर काहीजण शिक्षिकेचीही चूक असणार असे तर्क लावत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
https://x.com/gharkekalesh/status/1914629675353301452?t=oGZvgumiKYVgd0QZDa-pxQ&s=19
यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, ”अरे जरा तरी भान ठेवा” तर आणखी एकाने कॉलेजमधून तरूणीला काढून टाकण्याची मागणी केली आहे. एखाद्याचा फोन हा अशाप्रकारे खेचून जप्त करणं हेही किती योग्य आहे असाही सवाल काहींनी व्यक्त केला आहे.