Latest Marathi News
Ganesh J GIF

पत्नीने पतीच्या प्रेयसीची भररस्त्यात केली बेदम धुलाई

व्हिडीओ व्हायरल, पतीचे प्रेमसंबंध समोर आल्यानंतर पत्नीचा संताप, पाठलाग करत दिला चोप

मुझ्झपरनगर- पती आणि पत्नीचे नाते एकमेकांच्या विश्वासवर अवलंबून असते. पण अनेकदा काहीजण विश्वासघात करत असतात. असाच काहीसा उत्तर प्रदेशमधील मुझ्झपरनरमधून समोर आला आहे. या ठिकाणी एका पत्नीने आपल्या पतीचे लफडे पकडत पतीच्या प्रेयसीला चांगलाच बेदम चोप दिला आहे.

बायकोने आपल्या नवऱ्याला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडल्याची घटना घडून आली. आपल्या नवऱ्याला प्रेयसीसोबत बघितल्यानंतर बायकोने नवरा आणि तिची प्रेयसी यांची धुलाई केली आहे. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील अलीपूर खुर्द गावात घडून आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पतीचे गावातील एका तरुणीसिबत प्रेमसंबंध असल्याचा संशय पत्नीला होता. त्यामुळे तिने पतीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. यासाठी ती योग्य वेळेची वाट पाहत होती. एके दिवशी तिने आपल्या पतीला तरुणीसोबत बोलताना रंगेहाथ पकडले. यानंतर ती महिला थेट तरुणीच्या घरी गेली. पत्नीने प्रेयसीच्या घरी जाऊन गोंधळ घातला आणि केस ओढून तिला बेदम मारहाण केली आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. यात दिसत आहे की, महिला संतापाने पतीच्या प्रेयसीला मारहाण करत आहे, पण अचानक प्रेयसी तिच्या तावडीतून सुटत तेथून पळ काढते. पण ती महिला तिचा पाठलाग करत तिला पकडते आणि पुन्हा मारहाण करण्यास सुरु करते. यावेळी जवळच्या लोकांनी मध्यस्थी प्रयत्न केला खरा मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही. हा व्हायरल व्हिडिओ @TrueStoryUP  नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

 

या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात पतीला शिक्षा मिळायला हवी, अशी मागणी करण्यात आली आहे, तर अनेकांनी सगळीकडे अशीच परिस्थिती असल्याचे सांगत चिंता व्यक्त केली आहे, तर अनेकांनी तरुणीला देखील दोष दिला आहे. सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!