Latest Marathi News
Ganesh J GIF

पीएमपी बसचा प्रवास महागला! तिकिट दरात होणार इतकी वाढ

पंधरा दिवसात होणार नवीन दर लागू, दैनंदिन पासही महागला, असे असणार नवीन दर, कारण काय?

पुणे – पुणे महानगर परिवहन म्हणजेच पीएमपीच्या ताब्यात लवकरच नवे दर लागू होणार आहेत. विशेष म्हणजे २०१४ नंतर पीएमटीकडून पहिल्यांदाच ही दरवाढ होणार आहे. त्यानुसार आता किमान दर १० रूपये असणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड हद्दीत दैनंदिन पास ४० रुपयांऐवजी ७० रुपये, पीएमआरडीए हद्दीत १२० रुपयांऐवजी १५० रुपये आणि मासिक पास ९०० रुपयांऐवजी १५०० रुपये असतील. पीएमपीच्या तिकीट मशीन आणि इतर प्रणालींमध्ये बदल केल्यानंतर सुमारे पंधरा दिवसांत नवीन भाडे लागू केले जाईल. पीएमपीने यापूर्वी २० डिसेंबर २०१४ रोजी भाडेवाढ केली होती. राज्य परिवहन मंडळ, बेस्ट आणि नागपूर शहर बस सेवेने केलेल्या तिकीट वाढीच्या आधारे पीएमपीने नवीन भाडेवाढ प्रस्ताव तयार केला होता. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठीच्या पास दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पीएमपीएमएलच्या बसेससाठी लागू असलेले तिकीट दर आता नव्या पद्धतीने निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये चार टप्पे निश्चित करण्यात आले असून, ५ किलोमीटरपर्यंत प्रवासासाठी दर आता १० रुपयांवरून २० रुपये करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील ५.१ ते १० किलोमीटरसाठी दर २० रुपये, तिसऱ्या टप्प्यातील १०.१ ते १५ किलोमीटरसाठी ३० रुपये, आणि चौथ्या टप्प्यातील १५.१ ते २० किलोमीटरसाठी ४० रुपये आकारले जाणार आहेत. पीएमपीएमएलच्या नव्या तिकीट रचनेत सुधारणा करताना प्रवाशांसाठी स्मार्ट मोबाईल प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे. यामुळे तिकीट खरेदीसाठी आता स्मार्टफोनद्वारे तिकीट घेण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे रोख व्यवहार कमी होऊन अधिक सुलभ सेवा पुरवली जाईल, असे पीएमपीएमएलच्या अध्यक्षा डॉ. दीपा मुढोळे-मुंडे यांनी सांगितले आहे. दरम्यान पुणेकरांची जीवनवाहिनी असलेल्या पीएमपी बसने दररोज १२ लाखांहून प्रवासी प्रवास करतात. महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांकडून पीएमपी प्रवासाला पसंती दिली जाते. पीएमपी ही तोट्यात चालणारी संस्था आहे. कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार तसेच इंधन दरात झालेली वाढ यामुळे पीएमपीवर आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पीएमपीच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली नव्हती. पीएमपीच्या संचालक मंडळाने तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरवाढीच्या निर्णयाबरोबरच पुणे शहरात नव्या १००० इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा प्रस्तावही पीएमपी प्रशासनाकडून पुढे करण्यात आला आहे. सध्या पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरात पीएमपीएमएलच्या सुमारे २२०० बस कार्यरत असून, नव्या बसेस आल्यास सेवा अधिक सक्षम होईल. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वसामान्य प्रवाशांना यामुळे अधिक चांगली सुविधा मिळेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!