Latest Marathi News
Ganesh J GIF

वैष्णवीच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

शरीरावर मारहाणीच्या खुणा, वैष्णवीची हत्या की आत्महत्या, या दाव्यामुळे खळबळ, प्रकरणात ट्विस्ट

पुणे – मुळशीतील भुकूम येथे विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासे झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत. त्यामुळे हत्या कि आत्महत्या असा ट्विस्ट आता निर्माण झाला आहे.

डॉ. जयदेव ठाकरे आणि डॉ. एच.एस. ताटिया यांनी सादर केलेल्या शवविच्छेदन अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्याने झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत. अंतर्गत अवयव आणि इतर नमुने रासायनिक तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, विषप्रयोगाची शक्यताही तपासली जात आहे. पोलिसांनी हगवणे कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सासू आणि नणंदेला अटक केली आहे. शवविच्छेदन अहवालातील निष्कर्ष गंभीर असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी सांगितले की, तिच्या दोन्ही हातांवर, मांडीवर, पायावर, पाठीवर, डोक्यावर आणि गळ्याजवळ तसेच गळ्याच्या हनुवटीवर लालसर व्रण दिसत होता जखमेच्या खुणा होत्या. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानुसार कलमे वाढवली जाणार आहेत. २०२३ मध्ये वैष्णवी आणि शशांक हगवणे यांचा विवाह पुण्यातील सनीज वर्ल्ड येथे मोठ्या थाटात पार पडला. विवाहात वधूपित्याने ५१ तोळे सोने, फॉरच्युनर गाडी आणि चांदीची भांडी दिली होती. तरीही, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सासरच्या मंडळींकडून मानसिक त्रास सुरू झाला. किरकोळ कारणांवरून वाद, चारित्र्यावर संशय, आणि सततच्या धमक्यांमुळे वैष्णवीचा मानसिक छळ सुरूच राहिला, असा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे.

पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यापैकी पती, सासू आणि नणंदला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!