Latest Marathi News
Ganesh J GIF

हत्येच्या आरोपाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीला विमानतळावर अटक

अभिनेत्रीच्या अटकेनंतर दोन मंत्र्यांमध्ये वादाची ठिणगी, एकाकडून समर्थन, दुसऱ्याची टिका, नक्की प्रकरण काय?

ढाका – बांगलादेशी अभिनेत्री नुसरत फारिया मजहरबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नुसरत फारियाविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे बांग्लादेश सरकारमधील दोन मंत्री आमनेसामने आले आहेत.

२०२४ मधील एका प्रकरणात नुसरत विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. रविवारी(१८ मे) थायलंडला जात असताना नुसरतला ढाका एअरपोर्टवर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. २०२४ मध्ये सरकारच्या विरोधात प्रदर्शनादरम्यान एक घटना घडली होती. यात १७ लोकांची नावं समोर आली होती. त्यात फारियाचंही नाव आहे. यामध्ये काही विद्यार्थीही सहभागी झाली होते. या आंदोलनाला नंतर हिंसक वळण प्राप्त झालं होतं. यातील एका विद्यार्थ्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली नुसरतला अटक करण्यात आली आहे. शेख हसीना यांच्या समर्थकांच्या नेतृत्वाखालील चळवळींना आर्थिक मदत केल्याचा आणि हिंसक संघर्षांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिल्याचा आरोप फारियावर आहे. या आंदोलनांदरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे देशभरात अराजकता निर्माण झाली, त्यानंतर शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यांना भारतात आश्रय घ्यावा लागला. बड्डा झोनचे सहाय्यक पोलिस आयुक्त शफीकुल इस्लाम यांनी अटकेची पुष्टी केली. ते म्हणाले की, फारियाला प्रथम वातारा पोलिस ठाण्यात नेण्यात आले आणि नंतर ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या गुप्तहेर शाखेकडे (डीबी) सोपवण्यात आले, जिथे तिची चौकशी केली जात आहे. अटकेनंतर बांगलादेश सरकारमधील दोन मंत्री एकमेकांवर तुटून पडले आहेत. या प्रकरणावरून सरकारमध्येच वादळ निर्माण झालं आहे. सांस्कृतिक सल्लागार मुस्तफा सरवर फारुकी यांनी फेसबुक पोस्टमधून अटकेवर टीका केली. त्यांनी लिहिलं की, “पुरावे सिद्ध होण्याआधी कोणालाही अटक करणं चुकीचं आहे. ही घटना लज्जास्पद आहे.” त्यांच्या या विधानावरून एक मंत्री त्यांच्या बाजूने उभा राहिला, तर दुसऱ्याने अटकेचं समर्थन केलं.

नुसरत फारिया २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या मुजीब द मेकिंग ऑफ ए नेशन या सिनेमात पूर्व प्रधानमंत्री शेख हसीना यांची भूमिका साकारून नुसरत प्रसिद्धीझोतात आली होती. तिच्या या भूमिकेला पसंती मिळाली होती. श्याम बेनेगल यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. तसेच ती एक रेडिओ जाॅकी सुद्धा आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!