Latest Marathi News
Ganesh J GIF

वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणी माझ्या नवऱ्याला गोवण्यात आलय

वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी ट्विस्ट, नणंद आहे मास्टरमाईंड, पोलीसांकडे केली 'ही' मागणी, कारण काय?

पुणे – पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे. सासरच्या छळाला कंटाळून या विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर आता वैष्णवीच्या सासरच्या संपूर्ण कुटुंबाला अटक करण्यात आली आहे. पण आता मयूरी जगतापच्या एका दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी पोलीसांनी वैष्णवीच्या सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मुख्य आरोपींपैकी असलेल्या फरार सासऱ्याला राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. पण आता यावर मयूरी जगताप हीने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मयूरीने वैष्णवीला त्रास दिलेल्या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे ती म्हणाली, पोलिसांनी राजेंद्र हगवणेला अटक केली आहे. पोलीस तपास करून योग्य ती कारवाई करतील. अनेक लोक त्यांना साथ देत होती. असं वाटत असल्याने आतापर्यंत अटक झाली नाही. या प्रकरणामध्ये माझ्या नवऱ्याला विनाकारण गोवलं जात आहे. पोलिसांनी त्यांना देखील अटक केली आहे. ज्यांनी ज्यांनी वैष्णवीला त्रास दिला त्या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा व्हावी. माझ्या पतींनी आधीच फरार न होता समोर येऊन सांगायला हवं होतं. म्हणजे त्यांना अटक केलं नसतं. आणि मुख्य सूत्रधार समोर आले असते. मी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली असती तर वैष्णवी सोबत असं घडलं नसत, माझे नवीन लग्न झाले, तेव्हा नीलेश चव्हाण सारखा घरी यायचा, पण मला काही माहिती नाही. थोड्या काळानंतर समजले, की ते नणंद करिश्माचे मित्र होते. माझ्या किंवा वैष्णवीच्या भांडणात ते असायचे. नीलेशवर एवढे गुन्हे दाखल असताना, त्याच्याकडे रिव्हॉल्वर कशी काय, हा प्रश्न आहे. तो विचित्र गुन्हेगारच समजायचे, असे मयूरी जगताप म्हणाली आहे. नणंदेला माझा पती करीत असलेला लाड पाहवत नव्हते. साडीपासून सर्व गोष्टींमध्ये तिचा वरचढ होता. तिच्या म्हणण्यानुसार सर्व होत होते. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा आमच्याशी वाद घातला जात होता. इतकेच नव्हे तर चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झाला, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला आहे. या प्रकरणात आता मयुरीच्या नव्या दाव्यामुळे वैष्णवी प्रकरणाला वळण मिळण्याची शक्यता आहे.

हगवणे कुटुंबातील सासरे, नणंद यांच्याबाबत मयुरी जगताप यांनी गंभीर आरोप केले आहेत. या सगळ्या प्रकरणाला खरी कारणीभूत नणंद असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तिने माझ्या चारित्र्यावरही संशय घेतला होता. तर सासऱ्यांकडून मला मारहाणही झाली होती, असा दावा केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!