
जुन्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पत्नीची केली निर्घुण हत्या
सैन्य दलातील जवानाचे राक्षसी कृत्य, अंत्यविधीतील त्या चुकीमुळे कट उघड, प्रज्ञासाठी शारदाचा बळी
धुळे – धुळे जिल्ह्यातील वलवाडी या गावामध्ये अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यामुळे सैन्य दलामध्ये असलेल्या कपिल बागुल याने पत्नी शारदा हिची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
शारदा बागुल असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती कपिल बागुल याने ही हत्या केली आहे. कपिल आणि शारदा यांचा २०१० मध्ये विवाह झाला होता. या दोघांना ९ वर्षाची मुलगी आणि ७ वर्षाचा मुलगा आहे. कपिल याचे शिक्षण धुळ्यातील जयहिंद कॉलेजमध्ये झाले. कॉलेजमध्ये असताना प्रज्ञा कार्डिले या मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते. पण प्रज्ञाचे २००७ साली लग्न झाले. पण तिचे आणि तिच्या पतीचे न पटल्यामुळे तिने घटस्फोटासाठी अर्ज केला. सध्या त्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे कपिल आणि प्रज्ञा यांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. पण शारदा यामध्ये अडथळा ठरत होती. त्यामुळे कपिल हा शारदाचा छळ करत होता. याबाबत जळगाव येथे महिला आयोगाकडे गेल्यावर्षी तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. पण आयोगाने ही बाब गांभीर्याने घेतले नाही. घटनेच्या दिवशी कपिलने पुजावर विष प्रयोग केला. विषप्रयोग केल्यानंतर पूजाच्या तोंडातून फेस यायला लागला. या दरम्यान तिचा मृत्यू झाला. पण कपिलने त्यानंतर तिला रूग्णालयात दाखल केले. मृतदेह प्रथम खाजगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. या दरम्यान कपिलने तिच्या अंत्यविधीची तयारी सुरु केली. ही बाब पश्चिम देवपूर पोलिसांना कळवल्यानंतर, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला, जिथे पूजाला जबरदस्तीने कीटकनाशक टोचण्यात आल्याचे स्पष्ट झाले. इंजेक्शनच्या डागांमुळे तिच्या हातावर आणि तोंडावर काळे-निळे डाग होते. ही बाबा शारदाच्या माहेरी समजल्यानंतर त्यांनी कपिलच्या कुटुंबावर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. यावेळी अंत्यसंस्कार रोखण्यात आल्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
पोलिसांनी पूजा हिचा पती आरोपी कपिल, सासू विजया, नणंद रंजना, आणि प्रेयसी प्रज्ञा यांना अटक केली आहे. या संदर्भात पुढील कारवाई धुळ्यातील पश्चिम देवपूर पोलीस करत असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तातडीने भेट देऊन पाहणी केली आहे.