Latest Marathi News
Ganesh J GIF

धर्मांतरासाठी दबाव गर्भवती महिलेची आत्महत्या

खोटा धर्म सांगत हिंदू तरुणीशी केले लग्न, लग्नानंतर धर्म बदलण्यासाठी छळ, ऋतुजाचा हकनाक बळी

सांगली – हुंडाबळीसाठी विवाहितेने आत्महत्या केल्याच्या घटना अलीकडच्या काळात समोर आल्या आहेत. पण सांगलीत एक विचित्र घटना समोर आली आहे. धर्मांतरासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून सात महिन्यांच्या गर्भवती महिलेने आत्महत्या केली आहे.

सांगली जिल्ह्यात सासरच्या लोकांकडून ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित होण्यासाठी विवाहितेवर दबाव टाकण्यात येत होता.त्यामुळे ऋतुजा राजगे या महिलेने आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये ऋतुजा आणि सुकुमार यांचा विवाह झाला. विवाहापूर्वी राजगे कुटुंबाने स्वतःला हिंदू धनगर असल्याचे सांगितले होते. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच हे कुटुंब ख्रिश्चन असल्याचे ऋतुजा आणि तिच्या माहेरच्या मंडळींच्या लक्षात आले. तरीही ऋतुजाने याकडे दुर्लक्ष करत संसार चालू ठेवला. पण, पती सुकुमार, सासरे सुरेश आणि सासू अलका यांनी ऋतुजावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. तिला हिंदू देवतांना नमस्कार करणे बंद करण्यास आणि चर्चला येण्यास सांगितले. शहरातील चर्च मध्ये घेऊन जात तिच्यावर धर्मांतरासाठी बळीजबरी करण्यात आली. पण ऋतुजाने त्याला नकार दिला. ज्या दिवशी हिंदू सण असेल त्या दिवशी जाणूनबुजून मांसाहारी पदार्थ केले जायचे. विशेष म्हणजे या सर्व प्रकारत चर्चमधील पास्टरांनीही तिच्या हिंदु धर्माच्या पूजेमुळे कुटुंबाला अडचणी येत असल्याचे सांगितले. त्यामुळे ऋतुजाला जास्त त्रास दिला जाऊ लागला. इतकेच नाही तर तिला मारहाण आणि तिचा छळ सुद्धा सुरू होता. ऋतुजाने आपल्या आई-वडिलांना या त्रासाबद्दल सांगितले होते. त्यांनी अनेकदा सासरच्या मंडळींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण सासरची मंडळी धर्मांतर करण्यावर ठाम होते. या सततच्या मानसिक छळाला आणि दबावाला कंटाळून ऋतुजाने सात महिन्यांच्या गरोदरपणात गळफास लावून आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे ऋतुजा ७ महिन्यांची गर्भवती होती. पुण्यातील वैष्णकी हगवणे मृत्यू प्रकरणाने सध्या संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. आता तशीच घटना घडल्याने विवाहितेच्या छळाचा मुद्दा समोर आला आहे.

या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी ऋतुजाचा पती सुकुमार राजगे, सासरे सुरेश राजगे आणि सासू अलका राजगे यांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!