
पत्नीने आत्महत्या केल्यानंतर पतीनेही संपवले जीवन
जोडप्याच्या आत्महत्येने खळबळ, भांडनानंतर दोघांचाही टोकाचा निर्णय, त्या सीसीटीव्हीमुळे चर्चेला उधान?
जयपूर – एका विवाहित जोडप्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जयपूरमधील मुहाना भागात दादू दयाल नगरमध्ये ही घटना घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
धर्मेंद्र चौधरी आणि सुमन चौधरी अशी आत्महत्या केलेल्या जोडप्याचे नावे आहे. दोघांनी गळफास लावून आयुष्याची अखेर केल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती धर्मेंद्र चौधरी एका फायनान्स कंपनीत काम करत होते. तर सुमन स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. दरम्यान आत्महत्या करण्याआधीचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात धर्मेंद्र कार सुरू करताना दिसतो. सुमन त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतेय. ती कारजवळ उभी राहत त्याला विनवणी करत. आहे. पण धर्मेंद्रने तिला बाजूला करत गाडी मागे घेतली. त्यानंतर दोघांमध्ये वाद होतो. अखेरीस धर्मेंद्र कार पार्क करतो आणि दोघे पुन्हा एकत्र बोलताना दिसतात. यामुळे दोघांमध्ये कोणत्या तरी कारणामुळे वाद होता, असे दिसत आहे. दुसरे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळाले आहे. त्यात दोघेही इमारतीत एकत्र प्रवेश करत आहेत. सुमनच्या हातात एक बॅग आहे. त्यानंतर ते दोघे कोणाला दिसले नाहीत. पोलीस अनेक शक्यतांचा तपास करत आहेत. यात प्रेमसंबंधाची शक्यता देखील आहे. पोलिसांना संशय आहे की, भांडणानंतर आधी सुमनने आत्महत्या केली. धर्मेंद्रने तिचा मृतदेह खाली उतरवला. तिला वाचवता आले नाही हे लक्षात आल्यावर त्यानेही आत्महत्या केली. ही खरोखरच आत्महत्या होती का, की त्यामागे आणखी काही कथा आहे? पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
https://x.com/chhavi_avasthi/status/1939172957894615042?
हे जोडपे मूळचे भरतपुर जिल्ह्यातील होते. ते दोघे जयपूरमध्ये राहत होते. त्यांची दोन मुले गावी आहेत. कुटुंबीयांनी शनिवारी त्यांचे मृतदेह गावी नेले. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस तपास करत आहेत.