
हाॅटेल भाग्यश्रीच्या मालकीणीवर तरूणाचा जीवघेणा हल्ला
सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यामुळे खळबळ, तरुणाला मारहाण झाल्यामागचा धक्कादायक खुलासा, आता बाऊंसरचा पहारा
धाराशिव – हाॅटेल भाग्यश्री हे सध्या खव्वयांचे हक्काचे ठिकाण बनले आहे. सोशल मिडीयावर तर हाॅटेल भाग्यश्री चांगलेच लोकप्रिय आहे. नाद करती काय आणि यावच लागतयं हे डायलाॅग तर कॅच लाईन झाले आहेत. पण मागील काही दिवसापासून हाॅटेल भाग्यश्री हाॅटेलमध्ये होणाऱ्या हाणामारी आणि वादामुळे चर्चेत आले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील हाॅटेल भाग्यश्रीमध्ये काल कामगार आणि ग्राहकामध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चेला उधान आले होते. पण आता या मागचे खरे कारण समोर आले आहे. हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांनी हाॅटेल भाग्यश्रीच्या इन्स्टा अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे. सीसीटीव्हीत दिसत आहे की, एक तरुण गल्ल्यामध्ये हात घालण्याच प्रयत्न करत होता. त्याला मालकीनीने रोखल्याने त्याने त्यांच्यावरच हात उचलला. त्यामुळे हाॅटेलचे कर्मचारी आक्रमक झाले आणि त्यांनी त्या तरुणाला चांगलाच चोप दिला. हॉटेल भाग्यश्रीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सीसीटीव्ही फुटेज शेअर केला आहे. त्यामध्ये तरुणाने हाच उचलल्याचं स्पष्ट दिसतंय. त्यामुळेच नंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. तोही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या सगळ्या प्रकारांमुळे हॉटेल मालकाने पुण्यातून बाऊन्सर्स मागवले आहेत. पण या सगळ्या प्रकारामुळे हाॅटल भाग्यश्री पुन्हा एकदा चर्चेत आले होते. आता मडके पोलिसात तक्रार करणार का नाही? याबाबतची माहिती भेटू शकली नाही. दरम्यान आपल्या हटके डायलाॅगमुळे चर्चेत असलेले हाॅटेल भाग्यश्री त्यांच्या हॉटेलला सातत्याने पडणाऱ्या दांड्या, यामुळे ते जोरदार ट्रोल देखील होत असतात.
अर्थात हाॅटेल भाग्यश्रीवर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागे एका लातूरच्या माथेफिरुने हॉटेल बंद असल्याचं कारण सांगत तोडफोड केली होती. त्यानंतरही एक दोन वेळ तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी मागच्याच महिन्यात काळ्या रंगाची फॉर्च्युनर गाडी खरेदी केल्यामुळे ते चर्चेत आलेले होते.