
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिंदे गटाच्या मंत्र्यांना दणका
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे तक्रार करूनही उपेक्षा कायम, दादांचे मंत्री तुपाशी, शिंदे गटाचे मंत्री मात्र अजून उपाशीच
मुंबई – राज्यातील महायुती सरकारमध्ये असणाऱ्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांमधील कुरबुरी सुरूच आहेत. आता फडणवीस यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांना जोरदार दणका देत मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे शिंदे गटात धुसफूस वाढली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारमधील सात मंत्र्यांना ओएसडी आणि पीए नियुक्त करण्यासाठीची परवानगी नाकारली होती. हा विषय अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. परंतु, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून पुन्हा एका मंत्र्यांचे पीए म्हणून कार्यरत असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंत्र्यांना अद्याप मर्जीतले खासगी सचिव न नेमल्याने दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर महायुती सरकारमध्ये मंत्र्यांच्या पदरी निराशाच आली असल्याचे बघायला मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून पुन्हा एका मंत्र्यांचे पीए म्हणून कार्यरत असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा आदेश मिळाल्यानंतरही मूळ विभागात हजर न झाल्यास संबंधित सरकारी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाईल. असा इशारा ही देण्यात आला होता. उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांसह एकूण सात मंत्र्यांना खासगी सचिव नेमण्यात आलेले नाहीत. महायुतीतील सात मंत्र्यांना अद्याप खासगी सचिव मिळाले नाहीत. अनेक मंत्र्यांकडे मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी नसताना खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकारी कार्यरत आहेत. आता सामान्य प्रशासन विभागाने या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली असून आठ दिवसांत उत्तर देण्यास सांगितले होते. त्यामुळे या मंत्र्यांचेही धाबे दणाणले आहेत. मंत्र्याकडे नियुक्त करण्यात आलेले ओएसडी आणि पीए हे मंत्र्यांचे अत्यंत विश्वासू अधिकारी असतात. या पदांवर जवळच्या व्यक्तीची नेमणूक करण्यासाठी सत्ताधारी घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यातच ही नियुक्ती करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही अटी घातल्या असून काही निकषही लावले आहेत. त्यामुळे या मंत्र्यांकंडील ओएसडी आणि पीए यांच्या नेमणुक रखडली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडे नवे खासगी सचिव नियुक्त कण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री आहेत. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने खासगी सचिवांच्या नावाला अद्यापही हिरवा कंदील दिला नाही, यामुळे या कॅबिनेट मंत्र्यांना खासगी सचिव अद्यापही नियुक्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे महायुतीत अस्वस्थता वाढत चालली आहे.