
कराडच्या टेबलावर महादेव मुंडेची हाडे, रक्त आणि कातडे होते
कराडला धनंजय मुंडेच्या पीएचाही काढायचा होता काटा, 'त्या' तीन खुनामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या?
बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणाचा मुख्य सु्त्रधार वाल्मिक कराड तुरूंगात आहे.पण असे असले तरी त्याचे सगळे जुने कारनामे आता समोर येत आहेत. आता कराड याचा एकेकाळचा सहकारी बाळा बांगर यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.
वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचे पीए प्रशांत जोशी यांना देखील मारायचे होते, असा आरोप विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी केला आहे. या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. बाळा बांगर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की धनंजय मुंडेंचे पीए प्रशांत जोशी यांनी वाल्मीक कराडचा फोन न उचलल्याने त्याचा इगो हर्ट झाला आणि त्याने मला सांगितले की आता प्रशांत जोशी याचा काटा काढायचा आहे. मी वाल्मिकला अनेक वेळा समजावून सांगितले, असा धक्कादायक खुलासा विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी केला आहे. बांगर म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी २ जुलै रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. तेव्हा वाल्मिक कराडला याची कल्पनाच नव्हती. त्यामुळे त्याचा इगो दुखावला गेला. त्याने धनंजय मुंडे यांचे पीए प्रशांत जोशी यांना फोन केले, परंतु त्यांनी ते उचलले नव्हते. ते त्यावेळी फोटो घेत होते. कराड आणि जोशी यांचे विचार आधीच जुळत नव्हते. त्यामुळे वाल्मिक कराडने धनंजय मुंडेंकडे तक्रार करत जोशींना काढून टाकण्याची मागणी केली होती. परंतु धनंजय मुंडेंनी तसं केलं नाही. त्यामुळे चिडलेल्या कराडने जोशीचा काटा काढायचा आहे, असं माझ्याकडे म्हटलं होतं, असं बांगर यांनी सांगितलं. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार धनंजय मुंडे यांना माहित होता, असा खुलासाही बांगर यांनी केला आहे. बांगर यांनी यावेळी गंभीर आरोप केला आहे. माझ्यासमोर वाल्मीक कराडने तिघांना मारलं, त्याचा मी साक्षीदार आहे. महादेव मुंडेंना मारल्यानंतर वाल्मीक कराडच्या टेबलवर त्याचं कातडं, हाड आणि रक्त आणून ठेवलं होतं. यानंतर वाल्मिक कराडने मारणाऱ्यांना शाबासकी दिली आणि गाड्याही गिफ्ट दिल्या, असा गौप्यस्फोट बांगर यांनी केला आहे. यामुळे कराड यांच्या अडचणी वाटणार आहेत.
वाल्मिक कराडची मोठी महत्त्वाकांक्षा होती. त्याला मंत्री व्हायचं होते. माझ्याकडे यायचा आणि भाषण शिकायचा. त्याला लीडर व्हायचं होतं, त्यामुळेच त्याने अमाप पैसा कमावला होता. धनंजय मुंडे नंतर त्याला बीडवा बाप व्हायचे होते, असा सनसनाटी दावा बाळा बांगर यांनी केला आहे.