Latest Marathi News
Ganesh J GIF

नवरीने असा डान्स केला की नवरदेव पाहतच राहिला

नवरीच्या अफलातून डान्सचा व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल, नवरी राॅक पण पाहुणे शाॅक

पुणे – लग्न म्हटले की घरातील लोकांचा उत्साह वेगळ्या उंचीवर असतो. पण अलीकडे लग्नात डान्स हा मस्ट झाला आहे. पाहुणेरावळे आणि मित्रमंडळी यांच्याबरोबर आता नवरा नवरी देखील लग्नात डान्स करताना दिसत आहेत.

सोशल मीडियावर लग्नातील अनेक व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात.खासकरून नवरा नवरीचे व्हिडिओ जास्त व्हायरल होत असतात. हल्लीच्या काळात नववधू सजून मंडपात नवरदेवाची वाट पाहण्याऐवजी संपूर्ण वऱ्हाडी मंडळींसमोर आपलं प्रेम व्यक्त करणं पसंत करत असतात. त्यात नवरा नवरी बिनधास्त डान्स करताना दिसत असतात. त्यात जर जोडीदार मनासारखा भेटला तर मग होणारा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत असतो. मनासारखा जोडीदार मिळतो तेव्हा लग्नातील प्रत्येक क्षण नवरा- नवरी दोघांसाठी आनंदी आणि आणखीच खास होतो. सध्या सोशल मिडीयावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यात नवरीने जबरदस्त डान्स केला आहे. व्हिडीओत दिसत आहे की, नवरा नवरीचा लग्नानंतरचा गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमात नवरी खांद्यावर पदर घेत नाचताना दिसत आहे. यावेळी नवरदेवही नवरीसोबत नाचताना दिसत आहे. संभळच्या तालावर नवरीनं ठेका धरत पारंपारिक डान्स केला आहे. नवरीने इतका जोरदार डान्स केला की, नवरदेव सुद्धा पाहत राहिला. नवरीच्या या डान्सचे जोरदार काैतुक होताना दिसत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर gavran_tadka1122 या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. नवरी खूश दिसतेय पासून एक नंबर डान्स अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!