
सुनेची आईसोबत मिळून सासूला लाथाबुक्क्यांनी मारहाण
सुनेचे राक्षसी कृत्य सोशल मिडीयावर व्हायरल, वडील पोलीस असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ, पण...
गाझियाबाद – सासु अणि सुनेचे नाते हे आई आणि मुलीप्रमाणे असते. पण अलीकडे संपत्तीच्या हव्यासापोटी सर्व नाती पायदळी तुडवली जात आहेत. सध्या गाझियाबादच्या गोविंदपुरम भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात सुनेने सासूला बेदम मारहाण केली आहे.
गाझियाबादमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या सुनेने आपल्या सासूला तिच्या आईच्या मदतीने बेदम मारहाण केली आहे. मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ही घटना १ जुलै रोजी घडली आहे. सून आकांक्षा हिचे तिची सासू सुदेश देवीसोबत काही कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे आकांक्षा आपल्या आईसोबत सासूकडे गेली आणि सासूला बेदम मारहाण केली. विशेष यावेळी आकांक्षाची आई आपल्या मुलीला थांबवण्यापेक्षा मोबाईलवर शूटिंग करत होती. व्हिडीओत दिसत आहे की, सुन सासूला मारहाण करत आहे तर सासू स्वतः वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाहीतर सुनेने सासूला केसाला फरफटत पायरीवरुन ढकलून देण्याचाही प्रयत्न केला. आकांक्षा आपल्या सासूला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असताना तिची आई फक्त पाहत राहिली. यांनंतर सुदेश देवी पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्या होत्या, पण आकांक्षाचे वडील दिल्ली पोलिसांत उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे तक्रार नोंदवून न घेण्याचा दबाव असल्यामुळे तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. पण आता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीसांनी आकांक्षा आणि तिच्या आईविरोधात गोविंदपुरम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया देत सुनेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की आता या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे.