Latest Marathi News
Ganesh J GIF

बलात्कार करुन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, मुलीचे टोकाचे पाऊल

अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल, आरोपीचा मोबाईलमध्ये अनेक मुलींचे व्हिडिओ, गावकरी संतप्त

सांगली – सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करगणीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतरही नराधमांचा त्रास सुरूच राहिल्याने तरूणीने आत्महत्या करत जीवन संपवले आहे.

सायली(नाव काल्पनिक)असे आत्महत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी चारजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी राजू विठ्ठल गेंड, आणि रामदास गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. अन्य दोन संशयित फरार आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी ७ जुलै रोजी सकाळी सायलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिला गावातील राजू गेंड, रामदास गायकवाड, रोहित खरात आणि बनपुरी येथील अनिल काळे हे शाळेत जात असताना त्रास देत होते. मुलीवर चार जणातील एकाने अत्याचार केला होता. यावेळी त्याने व्हिडिओ आणि फोटो काढले होते. एवढंच नाही,तर हे प्रकरण कोणाला सांगितल्यास तुझ्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचबरोबर त्याने माझ्या मित्रांसोबतही संबंध ठेव, असे म्हणत तिच्यावर दबाव टाकला. या सर्व गोष्टींना कंटाळून अल्पवयीन मुलीने घरातील लोखंडी छताच्या बारला गळफास घेऊन आत्महत्या केली. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असूनही, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला नाही, म्हणून आज गावकऱ्यांनी स्वतः चार आरोपींपैकी दोघांना पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. पण पोलीस याप्रकरणी कोणतीही कार्यवाही करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणाबाबत भाजप महिला नेत्या नीता केळकर यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात पोहोचून पोलिसांवर टीका केली आणि त्यानंतर आरोपींविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांना आरोपी गेंडच्या मोबाइलमध्ये अनेक मुली आणि महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आले आहेत.

आत्महत्या केलेली पीडित अल्पवयीन मुलगी एक चांगली क्रिडापटू होती. तिचे इंडियन आर्मित जाण्याचे स्वप्न होते. मात्र चार नराधमांमुळे तिचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. या घटनेने संतप्त झालेल्या करगणी गावकऱ्यांनी सर्व दुकाने आणि व्यवहार बंद ठेवून निषेध व्यक्त केला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!