
नगराध्यक्षाच्या पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पत्नी आणि मुलाचा त्रास असह्य झाल्याने उचलले टोकाचे पाऊल, फोन काॅलमुळे मोठा खुलासा, यामुळे केली आत्महत्या
सावंतवाडी – सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील प्रिया चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी देवगडच्या माजी नगराध्यक्ष प्रणाली माने यांच्या पती मिलिंद माने याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पण आता या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आला आहे.
प्रिया चव्हाण हिने शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. माने हा विवाहितेचा नातेवाईक असून त्याने मयत विवाहितेला मेडिकल शिक्षणासाठी चार लाख रुपये उसने दिले होते. ते त्यांना चव्हाण कुटुंबियांकडून परत दिले जाणार होते, मात्र या व्यवहारातून झालेल्या गैरसमजातून वाद उद्भवला. प्रिया हिने आत्महत्या करण्याच्या आदल्या रात्री संशयित प्रणाली माने व मुलगा आर्य माने याने प्रियाच्या सावंतवाडी येथे घरी जात आपल्या पती समोरच तिच्याशी वाद घातला. यामध्ये तिने अर्वाच्च भाषा वापरून प्रिया चव्हाण हिचा अपमान केला तसेच तिला धक्का ही दिला. ही सर्व घटना तेथील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. आमच्याकडून घेतलेले पैसै दे अन्यथा तुला बघून घेऊ, अशी धमकी देखील प्रणाली माने हिने प्रियसला दिली होती. या सर्व वादावादीमुळे मानसिक ताण घेऊन प्रिया चव्हाण हिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले होते. माने यांचे नाव तक्रारीत नव्हते, परंतु नातेवाइकांच्या जबाबात तसेच फोन सीडीआरवरून त्याचा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग दिसून आल्यामुळे त्याला ताब्यात घेतले गेले आहे. दरम्यान नवविवाहीता प्रिया पराग चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
प्रियाच्या नणंद तथा माजी नगराध्यक्षा प्रणाली माने यांचे पती मिलिंद आनंदराव माने यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांना ताब्यात घेतलं आहे. पण प्रकृती अस्थिर झाल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान प्रणाली माने यांच्यांसह मुलगा आर्य माने यांना न्यायालयाने दिलासा देताना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.