Latest Marathi News
Ganesh J GIF

दिराच्या लग्नात मोठ्या वहीनीने नवरीसोबत केले असे काही

मोठ्या वहिनी आणि नव्या नवरीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, लग्नात नवरीचा थाट पण जाऊबाईने एंट्री घेत ....

पुणे – लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनले आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असले, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता सुरु झाली आहे. त्याचे व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.

लग्नात नवरा नवरी हे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र असतात. आजकाल नवरा नवरी देखील स्वतः च्या लग्नात डान्स करत आपल्या जोडीदाराला सरप्राईज देत असतात. त्यात कुटुंबीय देखील उत्साहात सहभागी होत असतात. अगोदर दीर आणि भावजय यांचे नाते काहीसे अबोल आणि रुष्ठ होते. पण आता काळ बदलला आहे. वहिनी आणि दीर हे नाते आदराचे आणि मित्रत्वाचे बनले आहे. त्यामुळे दिराचं लग्न असलं की, मोठ्या वहिनीचा मोठा थाट असतो. सध्या सोशल मिडीयावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात वहिनीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिसत आहे की, वहिनी नवीन नवरा नवरीसमोर हम आपके हे कोन? या चित्रपटातील लो चली मे या गाण्यावर डान्स करत आहे. यात जाऊबाईचा उत्साह चेहऱ्यावर दिसत आहे. यावेळी हुकुम चलाऊंगी मे म्हणणाऱ्या मोठ्या वहिनीने होणाऱ्या जाऊबाईंनाही डान्स करायला लावला. यावेळी नवरीही प्रचंड खूश होत डान्स करताना दिसत आहे. वहिनीने दिलेले हे सरप्राईज नवरीलाही फार आवडल्याचे दिसत आहे. यावेळी पाहुणेमंडळी देखील उत्साही आणि आनंदी दिसत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ the_perffect_way नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी वहिनीचे काैतुक केले आहे. तर काहींनी असेच आनंदी रहा अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!