
भयंकर! प्रियकरासाठी महिलेने केली पोटच्या मुलीची हत्या
मुलीच्या हत्येच्या आरोपात पतीला अडकवायला गेली आणि फसली, संपत्ती आणि प्रियकरासाठी महिलेचा जीवघेणा कट?
लखनऊ – आईला आपल्याकडे देवाचा दर्जा दिला आहे. आईसाठी अनेक उपमा आणि आदर दिला आहे. कारण आई आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार होते. पण आईपणाला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. प्रियकरासाठी आईने आपल्या मुलीचा खून केला आहे.
रोशनी खान असे आरोपी आईचे नाव आहे. तर सोना असे हत्या करण्यात आलेल्या चिमुकलीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानचे लग्न आठ वर्षांपूर्वी रोशनी नावाच्या मुलीशी झाले होते. त्यांना एक मुलगी आहे. रोशनी आधुनिक विचारांची होती; तिला पार्ट्या, क्लब्स आणि डान्सची आवड होती. पण काही काळानंतर यामुळे त्यांच्यात वाद होऊ लागले. आणि त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. दोघेही वेगळे राहू लागले. एका क्लब पार्टीमध्ये रोशनीची ओळख उदित जयस्वालशी झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. रोशनी पतीला सोडून उदितसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली आणि सोबत मुलीलाही घेऊन आली. पण रोशनीला शहरुखची संपत्ती हवी होती. त्यामुळे तिने खोटे गुन्हे दाखल करत यामुळे शाहरुखच्या कुटुंबीयांना तुरुंगातही जावे लागले. या माध्यमातून रोशनीने फ्लॅटचा ताबा मिळवला. आणि ती आपल्या प्रियकरासोबत फ्लॅटवर राहू लागली. पण शाहरुख रोशनीला भेटण्यासाठी फ्लॅटवर येत होता. पण आता रोशनीला सगळी बिल्डिंग आपल्या ताब्यात घ्यायची होती. घटनेच्या दिवशी शाहरुख आपल्या मुलीला भेटण्यासाठी गेल्यावर रोशनी आणि शाहरुख यांच्यात वाद झाला. त्यानंतर रोशनीने आपल्या मुलीची हत्या केली. आणि ही हत्या शाहरुखने केल्याची तक्रार केली. पण पोलिसांना संशय आल्याने ती हत्या काही तासांपूर्वीची नसून, अधिक जुनी असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. शिवाय, चौकशीदरम्यान रोशनी सातत्याने आपले जबाब बदलत होती आणि प्रत्येक प्रश्नावर पोलिसांची दिशाभूल करत होती. अखेर, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर संपूर्ण सत्य उघड झाले. रिपोर्टमध्ये मुलीची हत्या ३६ तासांपूर्वी झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीसी खाक्या दाखवताच रोशनीने हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेने शहराला हादरवून टाकले आहे.
पती शाहरुखने सांगितले की, त्याच्या आईची संपत्ती हडप करण्यासाठी रोशनीने तिचा मेहूणा सलमान, सासू परवीन आणि दोन नणंदा रुखसर आणि रूमी यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत आणि सर्वांना तुरुंगात पाठवले आहे.