
विकृत पती आणि सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
मुलीच्या हत्या करून केली आत्महत्या, सुसाईड नोटमुळे खळबळ, मीनासोबत सासरची क्रूर वागणूक
शारजा – केरळमधील एका विवाहित महिला आणि तिच्या एक वर्षीय बाळाचा संयुक्त अरब अमिराती येथील शारजाह शहरात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. महिला आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
विपंचिका मणी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पती आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून महिलेने तिच्या बाळाची हत्या करुन नंतर आत्महत्या केल्याचा संशय आहे. मृत्यूपूर्वी विपंचिका मणी यांनी फेसबुकवर सुसाईड नोट अपलोड केली असता हा प्रकार उघडकीस आला. सुसाईड नोटमध्ये तिने पती, सासरे आणि नणंदेकडून छळ होत असल्याचा उल्लेख केला आहे. विपंचिकाच्या आईच्या म्हणण्यानुसार, तिला हुंड्यासाठी नियमितपणे त्रास दिला जात होता. तिच्या दिसण्यावरुन अपमानित केले जात होते. तसंच तिला मित्र परिवार, नातेवाईकांपासूनही वेगळे केले जात होते. ती सुंदर दिसू नये म्हणून तिचे टक्कल देखील करण्यात आले होते. विपंचिकाने लिहिले आहे की, प्रत्येकाला माझे पैसे हवे आहेत. नवऱ्याची बेवफाई, सासरचे अत्याचार आणि वहिनीचे टोमणे यांचाही त्यात उल्लेख होता. ही चिठ्ठी त्याच्या फेसबुक पेजवर झळकली पण नंतर ती डिलीट करण्यात आली. शैलजा म्हणाली की, नितीशने तिच्यावर घटस्फोटासाठी दबाव आणला आणि तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार केले. तिसे सासरे देखील शारीरिक शोषण करण्याचा प्रयत्न करत होते. जेव्हा तिने पतीला त्याच्या वडिलांच्या वागण्याबद्दल सांगितले तेव्हा तो तिला म्हणाला की, “मी फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्या वडिलांसाठीही तुझ्याशी लग्न केलं आहे.” तसेच पती अश्लील व्हिडिओ पाहून त्याप्रमाणे करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होता. यामुळे ती तणावात होती. दरम्यान विपंचिका शारजाह येथील एका खासगी कंपनीत लिपिक होती. २०२० मध्ये तिने नितीशसोबत लग्न केले.
कुंद्रा पोलिसांनी विपंचिकाचे पती नितीश वालियावीट्टील, सासरे मोहनन आणि वहिनी नीतू बेनी यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि हुंडा छळाचा गुन्हा दाखल केला होता. मुलगी आणि नातीला न्याय मिळावा यासाठी ही शेवटची आशा असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.