
मंडपात नवरीचा डान्स पाहून पाहुण्यांनी मारला डोक्यावर हात
नवरा नवरीच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, डान्स पाहून जोडीदार चिंतेत. एकदा बघाच!
मुंबई – आजकाल लग्नसमारंभात नवरी आणि नवरदेव खूपच उत्साहात डान्स करतात, हे आता खूपच सामान्य झालं आहे. असे डान्स व्हिडीओ व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. सध्या सोशल मिडीयावर एका जोडप्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
सध्या लग्न-समारंभात डान्स करणे एक ट्रेंड बनला आहे. वऱ्हाडी आणि घरातील मंडळी नवरी-नवरदेवाचा दिवस खास बनवण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण अनेकदा नवरी-नवरदेव स्वतःच विनोदाचे पात्र ठरतात. व्हायरल व्हिडिओत नवरा -नवरीने असा काही डान्स केला आहे की तो पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या डोक्याला हात लावला. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये लग्नाच्या दोन क्लिप्स एकत्र जोडलेल्या दिसतात. एका क्लिपमध्ये नवरदेव तर दुसऱ्या क्लिपमध्ये नवरी डान्स करत आहे. दोन्ही व्हिडिओ वेगवेगळे असून यात आपल्या जोडीदाराचा डान्स पाहून ओशाळल्याचे दिसून येत आहे. लग्नसमारंभातील गंमतीजमती नेहमीच व्हायरल होतात पण हा प्रसंग नेमका कॅमेऱ्यात कैद झाल्याने तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
हा व्हिडिओ ‘tabbuindianvoice’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यावर कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया केल्या आहेत. तर काहींनी त्यांच्या जोडीदारालाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.