Latest Marathi News
Ganesh J GIF

मोठी बातमी! रोहिणी खडसे यांच्या पतीला रेव्ह पार्टीत अटक

पुण्यातील रेव्ह पार्टी पोलिसांनी उधळली, रोहिणी खडसेही अडचणीत, राजकीय खळबळ आणि कनेक्शन

पुणे – पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात एका अलिशान फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांची छापेमारी केली. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई व रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती समोर आली आहे.

रेव्ह पार्टीत कोकेन आणि गांजा या अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या रेव्ह पार्टीवर छापा टाकल्यानंतर पुणे पोलिसांनी आपला मोर्चा शरद पवार गटाच्या नेत्या आणि प्रांजल खेवलकर यांचे पती रोहिणी खडसे यांच्या घराकडे वळवला आहे. पुणे पोलिसांकडून काहीवेळापूर्वीच रोहिणी खडसे यांच्या हडपसर येथील बंगल्यावर छापा टाकण्यात आला. याठिकाणी गेल्या काही वेळापासून पोलिसांकडून झाडाझडती सुरु आहे. पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोहिणी खडसे यांच्या घराची झाडाझडती घेतली जात आहे. दरम्यान, रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडल्यानंतर पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेले होते. ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर प्रांजल खेवलकर यांना हडपसर येथील त्यांच्या बंगल्यावर आणण्यात आले आहे. याठिकाणी आता पोलिसांना अंमली पदार्थांचा साठा सापडणार का, हे बघावे लागेल. तसे घडल्यास एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. हाऊस पार्टीच्या नावाखाली येथे रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश होता. २६ जुलै रोजी रात्री उशीरा ही छापेमारी करण्यात आली. या छापेमारीमद्ये अमली पदार्थ, हुक्का आणि दारू जप्त करण्यात आले आहे. आता यावर एकनाथ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. एकनाथ खडसे म्हणाले की, गेल्या काही दिवसात जे वातावरण सुरू आहे, त्यानुसार असं काही घडू शकते याचा अंदाज मला येत होता. कारण काही जण अत्यंत अडचणीत आहेत आणि ते आता अंतिम टप्प्यात येणार आहे. मी फारसे काही यावर बोलणार नाही. पुण्यात घटना घडली असे सांगितले जात आहे. मी हे मीडियातूनच पाहिले आहे. माझं अजून प्रत्यक्षात त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. कारण ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा स्रोत आणि पुरवठादार यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात हाऊस अॉफ पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टीचा धक्कादायक प्रकार समाेर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या रेव्ह पार्टीमुळे पुण्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या वापरामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!