Latest Marathi News
Ganesh J GIF

बिर्याणीवाल्यासाठी महिलेने रचला पती आणि मुलांच्या हत्येचा कट

टिकटाॅक स्टार महिला बिर्याणीवाल्याच्या प्रेमात झाली वेडी, असा रचला हत्येचा कट, प्रियकरासाठी आईच बनली मारेकरी

चेन्नई – बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झालेल्या महिलेने पती आणि दोन मुलांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आता दोन मुलांच्या हत्ये प्रकरणी महिला आणि प्रियकराला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अबीरामी ही महिला पती आणि मुलांसह तामिळनाडूतील कांचीपुरम येथे राहत होती. तिचा पती बँकेत काम करत होता, तिला सात वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी अशी दोन अपत्ये होती. अबिरामीला टिक टॉकवर व्हिडिओ बनवण्याची आणि बिर्याणी खाण्याची आवड होती. ति जवळच्या एका प्रसिद्ध बिर्याणी स्टॉलवरून बिर्याणी ऑर्डर करत असे. सतत बिर्याणीची आॅर्डर देण्यासाठी येत असल्यामुळे अबीरामी आणि मीनाची सुंदरम यांच्यात चांगली ओळख निर्माण झाली होती. या ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. याची माहिती अबीरामीच्या पतीला समजल्यानंतर त्याने तिला सुंदरमला भेटण्यास बंदी घातली. दोन्ही कुटुंबांनीही अबीरामीला प्रेमातून बाहेर पडण्यास सांगितले. पण यामुळे अबीरामीला पती आणि मुलांचा अडथळा वाटू लागला. त्यामुळे तिने नवरा आणि मुलांचा काटा काढायचे ठरवले. यासाठी सुंदरमने अबीरामीकडे झोपेच्या गोळ्या दिल्या. तिने त्या जेवणात टाकल्या पण यामुळे मुलीचा मृत्यू झाला, पण एक मुलगा आणि पती वाचले. पण पती बाहेर गेल्यानंतर अबीरामीने मुलाची उशीने तोंड दाबून हत्या केली. यानंतर अबीरामी आणि सुंदरमने कन्याकुमारीला पळून जाण्याचा निर्णय घेतला. तिच्या पतीला घरी आल्यानंतर सगळा प्रकार समोर आला. यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलीसांनी त्यांना अटक केल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.

न्यायालयाने अबीराम आणि तिच्या प्रियकराला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अबीरामी आणि सुंदरम यांनी प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयाला इतकी वर्षे तुरुंगात असल्याने त्यांची शिक्षा कमी करण्याची विनंती केली होती. पण न्यायालयाने ती फेटाळून लावली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!