
पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची गळफास घेत आत्महत्या
आत्महत्येपुर्वी व्हिडीओ करत सांगितली आपबिती, पत्नी अनुराधा आणि दुकानदाराचे संबंध ठरले आत्महत्येचे कारण
धाराशिव – पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने व्हिडिओ शेअर करत आत्महत्या केली आहे. पोलिसांनी व्यक्तीच्या मृत्यूपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार पत्नीसह तिच्या मित्रावर गुन्हा दाखल केला आहे.
तानाजी नानासाहेब भराडे यांनी झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. धाराशिव तालुक्यातील अळणी गावात ही घटना घडली आहे. तानाजी भराडे यांची पत्नी अनुराधा भराडे हिचे किराणा दुकानदार बालाजी घाडगे याच्यासोबत अनैतिक संबंध होते. याची माहिती तानाजी यांना समजल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण उलट अनुराधा आणि बालाजी यांनीच तानाजी यांना त्रास देण्यास सुरुवात केली. पत्नीच्या प्रियकराकडून वारंवार तानाजी भराडे यांना मानसिक त्रास होऊ लागला होता, त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. पत्नी अनुराधा आणि धाराशिव शहरातील बालाजी घाडगे यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी जीव देत असल्याचं त्यांनी सांगितलं. आपला जीव देण्यापूर्वी एक व्हिडिओ काढला, यामध्ये तानाजी भराडे यांनी म्हटलं आहे की, मी माझी पत्नी अनुराधा आणि बालाजी घाडगे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे. विशेष म्हणजे बालाजी घाडगे हा देखील विवाहित असून त्याला देखील दोन मुले आहेत. याप्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीसांनी पत्नी अनुराधा आणि तिचा प्रियकर घाडगे याला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक उद्धव हाके हे करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.