
भयानक! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या
अपघाताचा बनाव मुलीच्या जवाबामुळे फसला, राजश्रीच्या सुंदर चेहऱ्यामागील क्रुर विचारांनी पतीचा जीव घेतला
मुंबई – मुंबईमध्ये एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यांच्या १३ वर्षीय मुलीने केलेल्या खुलाशामुळे याचा खुलासा झाला आहे. पोलीसांनी पत्नीला अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वी आरे कॉलनीतील भरत लक्ष्मण अहिरे याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूचा शोध घेत असताना त्यांच्या १३ वर्षांच्या मुलीने मोठा खुलासा केला. आईचे विवाहबाह्य संबंध सुरू होते. यातून आईने प्रियकराची मदत घेऊन वडिलांच्या हत्येचा प्लान केल्याचे तिने सांगितलं. भरत अहिरे हा एक व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट होते. तर त्याची पत्नी राजश्री हिचे चंद्रशेखरसोबत विवाहबाह्य संबंध होते. भरतला या संबंधाची माहिती मिळाली. त्यानंतर भरतने चंद्रशेखरला फोन केला आणि त्याला आरे कॉलनीतील एका सार्वजनिक शौचालयाजवळ भेटायला बोलावले. यावेळी राजश्री चंद्रशेखर आणि रंगा असे तिघेही त्या ठिकाणी आले. प्रियकर चंद्रशेखरने भरतला जबर मारहाण केली. त्याच्या पोटात, छातीत आणि शरीराच्या इतर भागात लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी राजश्रीही तेथे होती. मात्र पती भरतला वाचवायला ती मध्ये पडली नाही. स्थानिक लोक तेथे जमा झाल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. यावेळी भरत जबर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी राजश्रीने त्याला घरी नेलं आणि तीन दिवस वैद्यकीय उपचार केले नाहीत. त्यानंतर मुलीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्यांनी भरतकाम रूग्णालयात दाखल केले. पण ५ आॅगस्टला भरतचा मृत्यू झाला. सुरुवातीला पत्नीने दावा केला की, तिचा पती दुचाकी अपघातात जखमी झाला होता. मात्र पोलीस चौकशीत राजश्रीच्या मुलीने आपल्या आईचं बिंग फोडलं. आणि आईचे चंद्रशेखर नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचं सांगितले.
मुलीने दिलेल्या जबाबामुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे तर चंद्रशेखर पडायाची आणि रंगा नावाचा आणखी एक आरोपी फरार आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. भरत यांच्या भावाने आणि वकिलांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.