
मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने वडिलांनी केली जावयाची हत्या
मुलीसमोरच केली तिच्या पतीची हत्या, मुलीचा मोठा दावा, तनु म्हणाली मी आता स्व:त....
दरभंगा – आंतरजातीय विवाह केल्यामुळे संतापलेल्या मुलीच्या वडिलांनी आपल्या जावयाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पण या घटनेनंतर सोशल मिडियावर दोन गट पडले आहेत. त्यामुळे ही हत्या चर्चेत आली आहे.
तनु प्रिया आणि राहुल कुमार हे दोघे नर्सिंगचे शिक्षण घेत होते. या दरम्यान त्यांच्यात प्रेम झाले. आणि त्यांनी ५ मेला लग्न केले. पण दोघांची जात वेगवेगगळी असल्यामुळे तुन प्रियाचे पालक या लग्नामुळे संतापले होते. दोघेही एकाच वसतिगृहाच्या वेगवेगळ्या मजल्यांवर राहत होते. तनुने सांगितले की, काल संध्याकाळी हुडी घातलेल्या एका माणसाला राहुलकडे येताना पाहिले आणि नंतर तिला समजले की तो तिचा वडील आहे. तिने सांगितले की त्यांच्याकडे बंदूक होती. ते माझे वडील प्रेमशंकर झा होते. त्यांनी माझ्या डोळ्यासमोर माझ्या पतीच्या छातीत गोळी झाडली. लग्न झाल्यानंतर तनुने माझे वडील आणि माझा भाऊ मला किंवा माझ्या पतीला इजा पोहोचवू शकतात, असा दावा केला होता. तनुने यावेळी सांगितले की, माझ्या पतीची हत्या करणा-या लोकांना जर फाशी दिली गेली नाही तर आपण स्व:त सगळ्यांची हत्या करुन आत्महत्या करणार असल्याचे सांगितले आहे.
या घटनेमुळे समाज दोन गटात विभागला गेला आहे, जिथे एकीकडे लोक आरोपी वडिलांना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत, तर काही लोक समर्थनात उभे असल्याचेही दिसून येत आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.