Latest Marathi News
Ganesh J GIF

किरकोळ कारणावरून दुचाकीस्वारांची जोरदार हाणामारी

पुण्यातील मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, उचलून आपटले, लोक फक्त पाहतच राहिले

हिंजवडी – हिंजवडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन दुचाकी चालकांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेत दोघांनी एकमेकांना बुक्क्यांनी, लाथांनी मारहाण केली. या मारहाणीच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

हिंजवडीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही घटना घडली. चौकातील वर्दळ आणि वाहतूक कोंडीदरम्यान वाकडच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूक रांगेत एक दुचाकी चालक आडवी दुचाकी घालून पुढे जात होता. यावरून दुसऱ्या दुचाकी चालकाने त्याला जाब विचारला. दोघांत शाब्दिक वाद सुरू झाला आणि आडवी दुचाकी घालणाऱ्या चालकाने दुसऱ्याच्या वाहनाला धक्का दिला. दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. बुक्क्यांनी आणि लाथांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली, पैकी एकाने दुसऱ्याला उचलून खाली आपटले. वाद कुणीही सोडवण्यासाठी पुढे येत नव्हते. वार्डनने देखील दोघांचा वाद सोडवण्यासाठी विशेष असे प्रयत्न केले नाहीत. ही सर्व घटना तिथे असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हाणामारी सोडवल्यानंतर दोन्ही दुचाकी चालक तिथून निघून गेले. पोलिसांकडून याप्रकरणी अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण व्हिडिओ समोर आल्याने याची चर्चा होताना दिसत आहे.

 

या सगळ्या गोंधळाकडे चौकातील नागरिक आणि वाहनचालक फक्त पाहत राहिले. वाहतूक वार्डननेही काही वेळ बघ्याची भूमिका घेतल्यानंतर अखेर पुढे येत मध्यस्ती केली. पण या प्रकरणामुळे पुन्हा एकदा रहदारी आणि शिस्त यावर पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!