
भरचाैकात पत्नीची पतीला चापटांसह बेदम मारहाण
मारहाणीचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल, पोलिसांचा हस्तक्षेप तरीही पत्नीची मग्रुरी कायम नेमके काय घडले?
ललितपूर – उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यात एक अनोखी घटना समोर आली आहे. ललितपूरच्या एलीट चौकाजवळ एक पत्नीने पतीचे केस धरून बेदम मारहाण केली आहे. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर पत्नीने मारहाण बंद केली.
ललितपूरच्या चाैकात पती पत्नीत भांडण सुरू होते. पत्नीने अचानक पतीला मारहाण चालू केली. ती आपल्या पतीला चापटा लगावत होती. पण अचानक तिने दगड देखील भिरकावला पण सुदैवाने तो पतीला लागला नाही. महिलेने सांगितले की एलीट चौकाजवळ पतीने त्याच्या पत्नीचा मोबाईल हिसकावून घेतला आणि तो तोडला. मोबाईल तुटल्यामुळे पत्नी संतापली आणि तिने पतीला मारहाण करायला सुरुवात केली. चौकाच्या मध्यभागी हे दृश्य पाहून पोलिस कर्मचारी मदतीला आले, पण पत्नीने कोणाचेही ऐकले नाही. आणि पतीला बेदम मारहाण केली. एव
ढे होऊनही पत्नीनेच पतीवर आरोप केला आहे. ती सामान्य जातीची आहे, तिचा पती आदिवासी जातीचा आहे. पती तिच्यासोबत ग्वाल्हेरला गेला होता. जिथे त्याने तिला मारहाण केली, तिथे तिने इंदूरमध्येही त्याला मारहाण केली. तिने सांगितले की तिच्या पतीने तिला दारू पाजली होती. दरम्यान पत्नीच्या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की या प्रकरणी कोणीही तक्रार दाखल केलेली नाही. पोलीस स्व:त या घटनेची माहिती घेत आहेत. किंवा जर कोणी तक्रार दाखल केली तर कारवाई करु असे सांगितले आहे. दरम्यान या घटनेबद्दल अनेकांनी पत्नीवर कारवाईची मागणी केली आहे.