Latest Marathi News
Ganesh J GIF

दिवसाढवळ्या गोळ्या झाडून एकाची हत्या

हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद, दुचाकीवर येऊन गोळीबार, पत्नीचा मोठा आरोप, 'याचा' होता वाद?

मेरठ – उत्तर प्रदेशातील मेरठ येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे, दोन दुचाकीस्वारांनी भरदिवसा एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या केली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

अस्लम अन्सारी असे हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अस्लम अन्सारी हा व्यवसायाने स्वयंपाकी असल्याचे सांगण्यात येत आहे. तो आज सकाळी त्याच्या दोन्ही मुलींना शाळेत सोडण्यासाठी गेला होता. तो त्याच्या मुलींना शाळेत सोडल्यानंतर घरी परतत असताना, दोन दुचाकीस्वारांनी त्याच्यावर गोळीबार केला. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात खळबड उडाली होती. गोळी लागल्यानंतर अस्लम रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेनंतर लगेचच त्याला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विशेष म्हणजे सुमारे दीड वर्षांपूर्वीही अस्लमवर अशाच प्रकारे गोळीबार करण्यात आला होता. परंतु त्यात तो बचावला होता. अस्लमच्या पत्नीचा आरोप आहे की तिच्या दिराने मालमत्तेच्या वादातून तिच्या पतीची गोळी झाडून हत्या केली आहे. अस्लमच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

 

पोलिसांनी घटनास्थळावरून एक काडतूस जप्त केले आहे. अस्लमचे घर त्याला गोळी मारण्यात आली त्या ठिकाणापासून फक्त ५०० मीटर अंतरावर आहे. पोलीसांकडुन दोन नातेवाईकांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांची चौकशी केली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!