
मुलीच्या उपचारासाठी आलेल्या वडिलांनाच आला अटॅक आणि….
रग्णालयातील व्हिडिओ व्हायरल, डाॅक्टरांसमोरच शिक्षक वडिलांना आला अटॅक? काय घडल?
नंदुरबार – मुलीच्या उपचारासाठी रुग्णालयात गेलेल्या शिक्षकाला डॉक्टरांसमोरच ह्रदयविकाराचा झटका आला. एकच गोंधळ उडाला. बेशुद्ध झालेल्या शिक्षकाला डॉक्टरांनी तातडीने सीपीआर दिल्याने त्यांचे प्राण वाचले. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील एका खासगी रुग्णालयात घडली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात नेमसुशील विद्यामंदिर या शाळेत कार्यरत रवींद्र गुरव हे आपल्या आजारी मुलीला शहरातील ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. योगेश्वर चौधरी यांच्याकडे तपासणीसाठी घेवून गेले होते. ते डॉक्टरांसमोरील खुर्चीवर बसले होते. शेजारीच त्यांची मुलगी आणि पत्नी उभी होती. अचानक त्यांनी डॉक्टरांच्या टेबलावर डोके ठेवले. काही क्षण कोणाला काहीच समजले नाही. नंतर त्यांनी शरीराला झटका दिल्याने ते बेशुद्ध झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. डॉ. चौधरी यांनी क्षणाचाही बिलंब न करता तात्काळ गुरव यांच्यावर सीपीआर उपचार पद्धती सुरु केली. थोडावेळ सीपीआर दिल्यानंतर शिक्षक रवींद्र गुरव बेशुद्ध अवस्थेतून बाहेर आहे. यानंतर त्यांच्यावर तातडीने रुग्णालयातच उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी दाखवलेली तत्परता आणि योग्य उपचार पद्धती, यामुळे शिक्षकाचे प्राण वाचले. त्यामुळे याची चर्चा नंदुरबार जिल्ह्यात होत आहे.
अचानक उदभवलेल्या प्रसंगामुळे त्याच्यासमवेत असलेले त्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित सर्वच जणांची चांगलीच धावपळ उडाली होती. यानिमित्ताने सीपीआर बाबत जनजागृती होणे गरजेचे असल्याचे दिसून आले आहे.