
प्रसिद्ध सोशल मिडिया स्टारला ईडीने ठोकल्या बेड्या
बनावट बेबसाईट बनवत घातला गंडा, इन्स्टा क्वीन ईडीच्या कचाट्यात, कोणत्या प्रकरणात केली अटक?
मोहाली – केंद्रीय तपास यंत्रणा सक्तवसुली संचालनालयाने बनावट सौंदर्य उत्पादने विकणाऱ्या एका सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरला मनी लाँडरिंगच्या प्रकरणात अटक केली आहे. यामुळे आता ईडीने आपला मोर्चा सोशल मिडिया स्टार्सकडे वळवल्याचे दिसला आहे.
संदीपा विर्क असे अटक केलेल्या इन्फ्लुएन्सरचं नाव आहे. तिचे इंस्टाग्रामवर जवळपास १२ लाख फॉलोअर्स आहेत. संदीपा विर्कवर फसवणूक करून पैसे मिळवल्याचा आरोप आहे. तिने hyboocare.com नावाच्या वेबसाइटची मालकीण असल्याचे भासवले होते, जी FDA-मान्यताप्राप्त सौंदर्य उत्पादने विकण्याचा दावा करते. पण तपासणीत ही उत्पादने पूर्णपणे बनावट असल्याचे समोर आले. या वेबसाइटवर योग्य प्रकारे नोंदणी किंवा पेमेंट गेटवे काम करत नव्हते. तसेच, सोशल मीडियावरही तिची खास उपस्थिती नव्हती, व्हाट्सअॅप नंबर बंद होता आणि कंपनीचा पत्ताही अस्पष्ट होता. याशिवाय, संदीपाचा व्हॉट्सअॅप नंबर बंद होता आणि कंपनीचा कोणताही संपर्क क्रमांक उपलब्ध नव्हता. जो स्पष्टपणे मनी लाँड्रिंगकडे निर्देश करत होता. ईडीच्या चौकशीत विर्कचे आता बंद पडलेल्या रिलायन्स कॅपिटल लिमिटेडचे माजी संचालक अंगराई नटराजन सेथुरामन यांच्याशी असलेले कथित संबंधही उघड झाले. सेथुरामन यांच्या निवासस्थानी केलेल्या शोध मोहिमेत वैयक्तिक फायद्यासाठी निधीचा गैरवापर करण्यात त्यांची भूमिका सिद्ध झाली आहे.
महत्वाचे म्हणजे छाप्यात अनेक
महत्वाची कागदपत्रे सापडली आहेत. संदीपा विर्कला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आली असून तिला ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले आहे. पुढील दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.